ऑक्सिजनची टंचाई वाढत असतांना, श्रीगोंद्यात फॅब्रिकेशन चालकांनी ऑक्सिजन सिलेंडर देऊन प्रशासनास केले सहकार्य..

दिनांक २३ एप्रिल, श्रीगोंदा:

तालुक्यात कोरोना महामारीत ऑक्सिजनची भीषण टंचाई भासू लागली आहे. या परिस्थितीत भविष्यात अडचणी निर्माण होऊ नये, यासाठी श्रीगोंद्याचे तहसीलदार प्रदीप पवार यांनी तालुक्यातील वेल्डिंग व फॅब्रिकेशन व्यवसायीकांकडे आरोग्य यंत्रणेला ऑक्सिजनच्या टाक्या उपलब्ध करून द्याव्यात म्हणून केलेल्या आवाहनाला फॅब्रिकेशन चालकांची सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

संपूर्ण मानव जातीपुढे उभे ठाकलेल्या या कोरोना आपत्तीत आमचाही हातभार लाभावा यासाठी त्यांनी त्यांच्या उद्योगातून काही ऑक्सिजन सिलेंडर देण्याचे ठरवले आहे. त्यानुसार आज पासून सिलेंडर गोळा करण्याचे काम चालू करण्यात आले असल्याचे समजते आहे. गणेश इंजिनिअरिंग, साजन शुगर, विनोद हिरडे, विजयराज टेलर, राज इंजीनियरिंग यांनी मोठ्या संख्येने या टाक्या उपलब्ध करून दिल्या आहेत. तसेच, जय माता फॅब्रिकेशन, साई इंजिनिअरिंग, सुरज इंजिनिअरिंग, पिंपळे वेल्डिंग वर्क्स तसेच काष्टी मधील बहुतांश इंजिनिअरिंग वर्क्स चालकांनी ऑक्सिजन टाक्या देऊन मदत केली आहे.

https://bit.ly/bspmycityshrigonda

ऑक्सीजन अभावी कोरोना रुग्ण मरण पावत आहेत. एक पाऊल पुढे टाकून रुग्णांचे हाल होऊ नये व त्यांना उपचारात काही अडचण निर्माण होऊ नये. (While the shortage of oxygen was increasing in Shrigonda taluka, the fabrication drivers cooperated with the administration by giving oxygen cylinders.) म्हणून, या सर्व व्यवसाकांनी एकत्र येऊन हा चांगला प्रयत्न केलेला असल्याने त्यांचे कौतुक केले जात आहे.

स्रोत:(नानासाहेब शिंदे,संभाजी ब्रिगेड, श्रीगोंदा)

प्रतिकात्मक फोटोचा वापर करण्यात आला आहे.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading