“दक्ष नागरिक फौंडेशन” ने केलेल्या मागणीनंतर श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयासाठी BPAP मशीन कोरोना रुग्णांसाठी उपलब्ध..

दिनांक २३ एप्रिल, श्रीगोंदा:

श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयाकडे असलेले व्हेन्टीलेटर मशीन तज्ञ डॉक्टर उपलब्ध नसल्याने वापरात नाही. यामुळे अत्यावस्थ रुग्णांना स्थानीक आरोग्य विभाग सहकार्य करण्यास असमर्थ आहेत.

https://bit.ly/bspmycityshrigonda

परंतु, व्हेन्टीलेटर सारखेच काम करणारे BPAP हे मशीन अत्यावस्थ कोरोना रुग्णांसाठी वरदान ठरु शकते. यासाठी तज्ञ डॉक्टर किंवा टेक्निशियनची अवश्यकता नाही. हे चालविण्यास आपल्या रुग्णालयातील कोणतेही डॉक्टर समर्थ असु शकतात. आपण हे मशीन उपलब्ध करुन द्यावे. यासाठी “दक्ष नागरिक फौंडेशन” ने पत्राद्वारे मागणी केली होती. त्यावर तात्काळ कारवाई करीत, कोरोना रुग्णासाठी ती मशीन उपलब्ध करण्यात आली आहे. अत्यावस्थ कोरोना रुग्णास व्हेन्टीलेटरची अवश्यकता असेल तर, हे BPAP मशीन उत्तम काम करु शकते. हे मशीन व्हेन्टीलेटरचे काम करु शकते.

श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयासाठी BPAP हे मशीन तातडीने उपलब्ध करुन देऊन, अत्यावस्थ कोरोना रुग्णास वापरुन रुग्णांना व नातेवाईकांना दिलासा मिळू शकता. यासाठी केंद्रीय मंत्री सन्मा. नितीनजी गडकरी साहेब यांना ट्विट करुन आणखी १५ BPAP मशीनची मागणी केलेली असुन, श्रीगोंद्याचे आमदार या नात्याने हे मशीन अवश्यकते नुसार संख्येची खातरजमा करुन, उपलब्ध करावे. (BPAP machine available for Corona patients at Shrigonda Rural Hospital following the demand made by “Daksh Nagarik Foundation”.) अशी मागणी या मागणी पत्रात केली आहे. तहसीलदार श्रीगोंदा, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकिय अधिक्षक, ग्रामीण रुग्णालय, श्रीगोंदा यांनाही याच्या प्रती देण्यात आल्या आहेत.

स्रोत:(दक्ष नागरिक फौंडेशन चे प्रसिद्धी पत्र)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading