श्रीगोंदा तालुक्यातील रस्ते व पुलासाठी २३ कोटी रुपयांचा निधी मंजूर -आ.पाचपुते

दिनांक २३ एप्रिल, श्रीगोंदा:


श्रीगोंदा तालुक्यातील दळणवळणासाठी महत्त्वाचा समजला जाणारा श्रीगोंदा ते मांडवगण रस्ता व श्रीगोंदा – पारगाव सुद्रीक रस्ता तसेच पेडगाव येथील पुलासाठी २३ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आ.बबनराव पाचपुते यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिली.

https://bit.ly/bspmycityshrigonda

श्रीगोंदा तालुक्यातील दळणवळणासाठी महत्त्वाचा समजला जाणारा श्रीगोंदा – मांडवगण रस्ता दुरुस्ती साठी केंद्रीय मार्ग निधी मधुन सुमारे १२ कोटी ६५ लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून श्रीगोंदा ते खाकिबा देवस्थान पर्यंत काम होणार आहे या रस्त्यावरुन नगर ला जाणारी वाहतूक मोठ्या प्रमाणात असल्यामुळे हा रस्ता दुरुस्त होणे गरजेचे होते. म्हणून, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करून निधी मंजूर केला आहे. (Funds of Rs. 23 crore sanctioned for roads and bridges in Shrigonda taluka)

त्याचबरोबर श्रीगोंदा ते पारगाव रस्त्यासाठी ४ कोटीचा निधी व पेडगाव येथील मोठ्या पुलासाठी सुमारे ६.५ कोटी रुपयांचा निधी २०२१ च्या अर्थसंकल्पात मंजूर झाला असल्याची माहिती, आमदार बबनराव पाचपुते यांनी दिली. तालुक्यातील या सर्व कामांसाठी सुमारे २३ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. तर, लवकरच ही कामे सुरू होतील असेही आ.पाचपुते यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्राद्वारे कळविले आहे .

स्त्रोत:(प्रेसनोट)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading