श्रीगोंदा शहरात जागतिक आदिवासी दिन साजरा; शेकडो आदिवासी बांधवांची रॅली..

दिनांक ९ ऑगस्ट २०२४,श्रीगोंदा:

आज जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने श्रीगोंदा शहरात आदिवासी बांधवांनी मोठ्या उत्साहाने रॅलीचे आयोजन केले. शहर आणि तालुक्यातील शेकडो आदिवासी बांधवांनी या रॅलीत भाग घेतला आणि आपला उत्साह आणि एकात्मता प्रकट केली.

नमुद रॅली श्रीगोंदा बस स्थानकावरून सुरू होऊन शहराच्या विविध चौकांतून मार्गक्रमण करत तहसील कार्यालयासमोर शनी चौकात समाप्त झाली. यावेळी आदिवासी बांधवांनी महापुरुषांच्या जय घोषणांनी संपूर्ण शहर दणाणून सोडले.

यावेळी महिलांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती, ज्यामुळे या रॅलीला विशेष महत्त्व प्राप्त झाले. या रॅलीत पुरोगामी चळवळीतील अनेक नामवंत कार्यकर्त्यांनी भाग घेतला. यात चंदन घोडके, आबा रामफळे, नाना सांगळे, अजित भोसले, राहुल भोसले, अमर घोडके, सुनील ओहोळ, सतीश ओहोळ, ॲड. प्रकाश लोंढे, राहुल लोंढे, मिथुन चव्हाण, सचिन घोडके, नितीन जावळे, अशोक मोरे, निलेश गायकवाड यांसारख्या अनेक प्रमुख व्यक्तींनी सहभाग नोंदवला.

रॅलीच्या समारोपानंतर उपस्थितांनी आदिवासी संस्कृती आणि त्यांच्याप्रती असलेल्या सन्मानाची भावना व्यक्त केली. विविध ठिकाणी महापुरुषांच्या घोषणा देत, रॅलीच्या माध्यमातून आदिवासी बांधवांनी आपला ऐतिहासिक वारसा, संस्कृती आणि हक्कांची जाणीव जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला.

स्रोत:(आयोजीत रॅली)

जाहिरात…

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading