श्रीगोंदा तालुक्यात भिंगाण येथे आदिवासी दिन उत्साहात साजरा..

दिनांक ९ ऑगस्ट २०२४,श्रीगोंदा:

संपूर्ण देशभरात आदिवासी दिन उत्साहात साजरा करण्यात येत असताना, श्रीगोंदा तालुक्यातील भिंगाण गावातही या दिनाचे औचित्य साधून विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. भिंगाण हे गाव विशेषत्वाने ५०% आदिवासी समाजाचे निवासस्थान आहे, आणि या समाजाच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी हा दिन साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात तंट्या मामा यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. पूजनाचा मान चोराचीवाडी गावच्या सरपंच मनीषा संतोष शिंदे यांना मिळाला. त्यांच्यासोबत उपसरपंच सुनीता गजानन कापसे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संतोष शिंदे, अनिताताई घोलवड, परसराम लांडगे, नितीन शेंडगे, समाजाचे अध्यक्ष महादेव माळी, माजी सरपंच जयसिंगराव घोलवड आणि सुनील घोलवड आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात महिला भगिनी आणि तरुण मुलांचीही लक्षणीय उपस्थिती होती.

कार्यक्रमानंतर ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले. ग्रामसभेत ग्रामसेवक होले भाऊसाहेब यांनी ‘लाडकी बहिण’ योजनेबद्दल माहिती दिली. अंगणवाडी सेविका सविता शिंदे आणि मदतनीस राणी अनभुले यांनी योजनेचे अर्ज किती भरले गेले..? याची सविस्तर माहिती दिली. तसेच आदिवासी समाज बांधवांनी आपल्या अडचणी ग्रामसभेत मांडल्या. आधार कार्ड, जागेचे प्रश्न, घरकुल योजनेचा लाभ, आणि कुपन समस्या यांसारख्या विविध समस्यांवर चर्चा झाली.

तहसीलदार साहेबांनी या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी लवकरच गावात कॅम्प आयोजित करून सर्व प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. सरपंच मनीषा संतोष शिंदे यांनी आदिवासी बांधवांच्या समस्या सोडवण्यासाठी ग्रामपंचायत तत्पर असल्याचे सांगितले. कार्यक्रमाच्या शेवटी उपजिल्हाप्रमुख संतोष शिंदे यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

स्रोत:(आयोजीत कार्यक्रम)

जाहिरात..

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading