जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आरक्षण सोडत १३ ऑक्टोबरला; श्रीगोंदा तहसील कार्यालयात कार्यक्रम..

दिनांक ९ ऑक्टोबर २०२५,अहिल्यानगर:

जिल्हा परिषद निवडणूक विभाग आणि पंचायत समिती निर्वाचक गणांच्या आरक्षणाची सोडत सोमवार, १३ ऑक्टोबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आली आहे. हा संपूर्ण कार्यक्रम दुपारी १२.०० वाजता सुरू होईल.

राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार, जिल्हा परिषदेच्या जागांसाठीची मुख्य सोडत नेहरू सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, अहिल्यानगर येथे पार पडेल. या सोडतीत नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला आरक्षणासह), अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि सर्वसाधारण महिलांसाठीचे आरक्षण निश्चित केले जाईल.

जिल्ह्यातील सर्व १४ तालुक्यांमध्ये पंचायत समिती गणांच्या आरक्षणासाठी विशेष सभा आयोजित करण्यात आल्या आहेत. संबंधित तालुक्यांचे तहसीलदार यासाठी प्राधिकृत अधिकारी असतील.

  • श्रीगोंदा: श्रीगोंदा पंचायत समिती गणांच्या आरक्षणाची सोडत तहसिल कार्यालय, श्रीगोंदा येथे आयोजित करण्यात आली आहे.
    • इतर प्रमुख ठिकाणे: संगमनेर (प्रांत कार्यालय), कोपरगाव, राहाता, श्रीरामपूर, राहुरी, नेवासा, पारनेर, पाथर्डी, शेवगाव, कर्जत, जामखेड (सर्व तहसिल कार्यालये) आणि अहिल्यानगर (नियोजन भवन).

इच्छुक नागरिकांनी आणि राजकीय कार्यकर्त्यांनी १३ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता आपापल्या संबंधित ठिकाणी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

स्रोत:(जिल्हा माहिती अधिकारी)

Leave a Reply