उपलब्ध संसाधनांचा वापर करीत तालुका कार्यक्षेत्रात कायदा आणि सुव्यवस्था आबादीत ठेवत, सामाजिक उपक्रम राबविल्याने श्रीगोंदा पोलीस स्टेशनला आ.एस.ओ.मानांकन प्राप्त …


दि.१३ ऑगस्ट रोजी श्रीगोंदा पोलीस स्टेशनला( iso 9001-2015) मानांकन प्राप्त झाले असून ,१०५ निकषातील ९८ निकष पास केल्याने ,श्रीगोंदा पो.स्टे ला आ.एस.ओ.चे a+ मानांकन मिळाले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांनी पोलीस स्टेशनमध्ये दि.१४ रोजी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे . या अगोदर जिल्हातील शिर्डी आणि अकोले या दोन पोलीस स्टेशनला आ.एस.ओ.मानांकन मिळाले असल्याने ,अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा हे आत्ता तिसरे पोलिस स्टेशन ठरले आहे.श्रीगोंदा पोलीस स्टेशन कडून मुद्देमाल पोटी शासनाला (११,२५,०००) अकरा लाख पंचवीस हजार रुपये मिळालेले आहेत. या पोलीस स्टेशनच्या हद्दीत दरोडा आणि जबरी चोऱ्यांचे बहुतांशी गुन्हेे थांबविण्यात पोलिसांना यश आले आहे. शिवाय अवैध दारू विक्री करणाऱ्यांच्या विरोधात मागील वर्षी एकूण ३२८ गुन्हे दाखल केले असून, चालू वर्षी आठ महिन्यात १४७ गुन्हे दाखल करण्यांत आल्याने , अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर श्रीगोंदा पोलिसांचा चांगला वचक निर्माण झाला आहे . तालुक्यातील मटका, जुगार पूर्णपणे बंद करण्यात आला असून, पोलीस स्टेशनच्या हद्दीतील ३५ गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या इसमांचे तडीपारचे प्रस्ताव वरिष्ठांना पाठविले आहेत .त्यापैकी एकास सहा महिन्यांची तडीपारची शिक्षा लागू झाली आहे .त्याचबरोबर विविध गंभीर गुन्ह्यातील आरोपीस शिक्षा मिळाल्या आहेत. तसेच श्रीगोंदा पोलीस स्टेशन जास्तीत जास्त लोकाभिमुख होण्यासाठी सामाजिक उपक्रम घेत आहे .आदीवासी पारधी समाजाचे मेळावे घेऊन त्यांना गुन्हेगारी पासून प्रवूत्त करण्यासाठी प्रयत्न केला जात आहे .त्यांच्यातील अनेक मुलांना रोजगार निर्माण करून देण्यासाठी पुढाकार घेतला जातो आहे.

तालुक्यातील गावांमध्ये यात्रे निमित्ताने होणारे वाद मिटविण्यासाठी बैठका घेऊन जागीच वाद मिटविन्यात पोलिसांना यश मिळाले आहे . विविध सामाजिक उपक्रम राबवून पोलीस आणि सर्वसामान्य नागरिकां मधील दरी कमी केली गेली आहे.

पूर्वी श्रीगोंदा पोलीस स्टेशन म्हणजे कचऱ्याचे आणि भंगाराचे माहेरघर होते ,येथील सर्व कचरा साफ करून परिसर सुसज्य करन्यात आला आहे.येथे तक्रार देण्यासाठी आलेल्या नागरिकांना बसण्यासाठी बाके टाकली आहेत ,चांगले पाणी पिण्यासाठी कुलिंग मशीन बसविली ,जेलमधील आरोपीना भरपूर प्रमाणात पाणी उपलब्ध होण्यासाठी बोअर घेतला, पोलीस ठाणे परिसरात विविध फुलझाडे लावली आहेत त्याचप्रमाणें मोठ्या झाडांभोवती विश्रांती साठी ओटे तयार केले असल्याचे पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांनी या पत्रकार परिषदेत सांगितले आहे .

या सर्व कामांमध्ये पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा ,अप्पर अधीक्षक घनश्याम पाटील, अप्पर अधीक्षक जयंतकुमार मीना, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंढे ,मंदार जावळे ,उपनिरीक्षक निलेश कांबळे, विठ्ठल पाटील , महावीर जाधव व सर्व कर्मचाऱ्यांचे आणि श्रीगोंदेकरांचे सहकार्य लाभल्याचे पोवार यांनी यावेळी बोलतांना सांगितले .

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading