पालकमंत्री प्रा. शिंदे यांच्या हस्ते युवा माहिती दूत उपक्रमाच्या लोगोचे अनावरण

अहमदनगर, दि.१५ – माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या युवा माहिती दूत या उपक्रमाचा शुभारंभ आज राज्याचे जलसंधारण, राजशिष्टाचार, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. प्रा. शिंदे यांनी यावेळी तयार करण्यात आलेल्या लोगोचे अनावरण केले.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या युवा माहिती दूत या उपक्रमाचा शुभारंभ आज राज्याचे जलसंधारण, राजशिष्टाचार, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. प्रा. शिंदे यांनी यावेळी तयार करण्यात आलेल्या लोगोचे अनावरण केले.
युनिसेफच्या सहयोगाने राज्य शासनाचे उच्च शिक्षण विभाग आणि तंत्र शिक्षण विभाग यांच्या प्रत्यक्ष सहभागाने माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने युवा माहिती दूत हा उपक्रम हाती घेतला आहे. येथील शासकीय विश्रामगृह येथे हा कार्यक्रम पार पडला. प्र. जिल्हा माहिती अधिकारी दीपक चव्हाण, माहिती सहायक गणेश फुंदे यांच्यासह महाविद्यालयीन शिक्षकांची यावेळी उपस्थिती होती.
विविध शाखांमध्ये पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या महाविद्यालयातील युवकांमार्फत शासकीय योजनांची माहिती प्रस्तावित लाभार्थींपर्यंत थेटपणे पोहचविणे हे युवा माहिती दूत उपक्रमाचे वैशिष्ट्य आहे.
आजमितीला शासकीय योजनांच्या माहितीचा प्रसार हा मुख्यत्वे वृत्तपत्रे,दूरचित्रवाणी वाहिन्या आणि रेडिओ यांच्यामार्फत केला जातो. सोशल मीडियाचा होणारा उपयोग मर्यादित स्वरुपाचा आहे. शिवाय, शासकीय योजनांचे बहुतांश प्रस्तावित लाभार्थी हे अर्धशिक्षित, दारिद्रयरेषेखालील आणि दुर्गम भागातील असल्याने वृत्तपत्रे, दूरचित्रवाणीसंच अथवा रेडिओ ही माध्यमे ते वापरतात असे नाही. प्रस्तावित लाभार्थ्यापर्यत न पोहचणाऱ्या शासकीय योजना दुहेरी संवादातून त्यांच्यापर्यत प्रभावीपणे पोहचविण्यासाठी राज्यातील समाजकार्याची आवड असलेल्या उत्साही तरूण वर्गाचे सहाय्य घेण्याचा युवा माहिती दूत या उपक्रमाचा महत्वाचा उद्देश आहे.
राज्यात ६ हजारपेक्षा जास्त महाविद्यालये आहेत. या महाविद्यालयामध्ये एकूण सुमारे २३ लाख पेक्षा जास्त विद्यार्थी शिकत आहेत. त्यापैकी किमान ५ ते ७ टक्के विद्यार्थी म्हणजे किमान १ लाख युवक या उपक्रमात सहभागी होतील अशी अपेक्षा आहे. गुगल प्ले स्टोअरवरुन विद्यार्थ्यांना हे ऐप डाऊनलोड करुन घेता येणार आहे.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading