३१ रोजी मंगळवारी सुनील तुपे यांच्या पाण्यासाठी खोदलेल्या खड्ड्यात एका अनोळखी महिलेचा विवस्त्रावस्थेतील मृतदेह आढळला होता. या महिलेच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार केल्याच्या जखमा होत्या. त्यावरून श्रीगोंदा पोलीस ठाण्यात भादवी कलम ३०२,२०१ नुसार अज्ञात व्यक्तीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला.
याबाबत सविस्तर असे की,औटेवाडी येथे दि.३१रोजी मंगळवारी सुनील तुपे यांच्या पाण्यासाठी खोदलेल्या खड्ड्यात एका अनोळखी महिलेचा विवस्त्रावस्थेतील मृतदेह आढळला होता या महिलेच्या गळ्यात साडीच्या तुकड्याने दगड बांधलेले होते. तसेच गळ्यावर धारदार शस्त्राने वार केल्याच्या जखमा होत्या. त्यावरून श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गु रं न आय ३६६/२०१८ भा.दं.वि. कलम ३०२ ,२०१ नुसार अज्ञात व्यक्तीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला . पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा , अतिरिक्त पोलिस अधीक्षक घनश्याम पाटील , शेवगाव पोलीस उपविभागीय अधिकारी अरुण जगताप यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या सूचना केल्या.
श्रीगोंदा पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार यांनी सहायक पोलिस निरीक्षक विठ्ठल पाटील , पो.हे.कॉ अंकुश ढवळे ,पो.कॉ किरण बोराडे, उत्तम राऊत,प्रकाश वाघ,दादा टाके,संतोष कोपनर यांचे तपास पथक नेमले. सदर महिलेच्या मृतदेहावर एक बनावट सोन्याची आंगठी व चांदीचे जोडवे सापडले होते. पोलिसां समोर सर्वप्रथम महिलेची ओळख पटवण्याचे आव्हान होते. त्यामुळे तपास पथकाने बीड जिल्ह्यातील आष्टी,कर्जत,जामखेड येथील पोलीस ठाण्यात जाऊन मिसिंग महिलेचा शोध घेतला. तोपर्यंत पो. नि. पोवार यांनी मयत महिलेचे जोडवे श्रीगोंदा शहरातील एका ज्वेलर्सच्या दुकानात नेऊन त्यांच्या मदतीने, या जोडव्यांवरील होलमार्कचा शोध घेतला असता.कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथील कुमार काका ज्वेलर्स दुकान असल्याचे निष्पन्न झाले. पो. नि. पोवार यांनी सदर ज्वेलर्सकडे याबाबत चौकशी केली असता, पोलिसांना काही गावांची नावे निष्पन्न झाले. तोपर्यंत मयत महिलेच्या वर्णनाशी मिळती जुळती एक तक्रार कर्जत पो.ठाण्यात दाखल झालेली होती. कर्जत तालुक्यातील नागलवाडी येथील रहिवासी असणारे बाबा साहेबराव डाडर यांनी दि.१ऑगस्ट रोजी त्यांची तीस वर्षीय पत्नी कविता बाबा डाडर या दि.२८ जुलै शनिवार रोजी गायब झाल्याची तक्रार दाखल केली होती.
बाबा डाडर यांना श्रीगोंदा पोलिसांनी मयत महिलेच्या मृतदेहाजवळ सापडलेल्या वस्तू दाखवल्या असता त्यावरून सदर मयत महिला ही आपली पत्नी कविता डाडर हीच असल्याचे सांगितले. मयत महिला कविता ही त्यांच्याच गावातील नागलवाडी येथील बाळासाहेब कल्याण बांदल (वय ५०) यांच्या विटभट्टीवर मजुरी काम करत होती.अशी माहिती समजल्यामुळे पोलिसांनी संशयावरून विटभट्टीमालक बाळासाहेब कल्याण बांदल रा.नागलवाडी , ता कर्जत याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता, त्याने मयत कविता डाडर ही आपल्याकडे वीटभट्टीवर कामावर येत होती तेंव्हा तिचे आणि माझे प्रेम संबंध,जुळले होते आणि त्यातूनच तिला मी कामापोटी सव्वा लाख रुपये उचल दिली होती. ते पैसे परत मागितल्यावर कविता ही टाळाटाळ करत होती. तसेच ती सतत कुणाशी तरी फोनवर बोलायची त्यावरून माझा तिच्यावर संशय बळावला होता. दि.२८ शनिवारी रोजी दुपारी मयत महिला बाळासाहेब बांदल सोबत श्रीगोंद्याकडे जाण्यासाठी त्याच्याच दुचाकीवरून निघाले यावेळी घायपातवाडी जंगलाजवळ आल्यानंतर बांदल याने कविता हिला पैशांची मागणी केली असता. तिने पैसे देण्यास नकार दिला.यावरून त्या दोघांत वाद झाले आणि त्यातून बांदल याने सोबत आणलेल्या चाकूने कविताच्या गळ्यावर वार करून तिचा खून करून तिचा मृतदेह औटेवाडी तलावातील पाण्याने भरलेल्या खड्ड्यात आणून टाकला.अशी माहिती आरोपी बाळासाहेब कल्याण बांदल याने देत, घटनास्थळी याबाबत पोलिसांना गुन्ह्याचे प्रात्यक्षिक देखील करून दाखवले.
या घटनास्थळी वर नमूद घटना घडली ,त्या ठिकाणी परिसराची पाहणी केल्यास सदर कार्यक्षेत्र हे पूर्ण निर्मनुष्य असून याठिकाणी घनदाट जंगल आहे.शेजारीच औटी वाडीचे मोठे तळे आहे .दरम्यान श्रीगोंदा ते आढळगाव असा जुना कच्चा रस्ता आहे.आणि तोही अतिशय निर्जन आहे .याचाच फायदा घेत या घटनेसह यापूर्वी घडलेल्या घटनांना या परिसराचा फायदा मिळाल्याचे निस्पन्न झाले आहे.हे ठिकाण वनविभागाच्या अखतारीत येते ,याठिकाणी वन विभागाचा कोणताही वनपाल उपस्थित नाही .दारू पीनारे ,अवैध गौन खनिज उत्खनन करणारे ,लफडेबाज ,यांचा या ठिकाणांवर हैदोस घालतांत हे नमूद आहे.व वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांची या परिसरा कड़े दुर्लक्ष असल्याचे या उदाहरनांनी समोर येते आहे.
(बातमी -मच्छिन्द्र सूद्रीक)
