जिल्हा माहिती कार्यालयातील सायकल संदेश वाहक रमेश उर्णे सेवानिवृत्त …

जिल्हा माहिती कार्यालयातील सायकल संदेश वाहक रमेश उर्णे सेवानिवृत्त …

अहमदनगर ,दि. ३१:

येथील जिल्हा माहिती कार्यालयातील सायकल संदेशवाहक रमेश शंकर उर्णे हे प्रदीर्घ सेवेनंतर आज दिनांक 31 जुलै रोजी सेवानिवृत्त झाले. यावेळी कार्यालयाच्या वतीने त्यांचा आणि कुटुंबियांचा सत्कार करुन त्यांना निरोप देण्यात आला. शहर प्रेस क्लबच्या वतीनेही अध्यक्ष मन्सुर शेख आणि महेश महाराज देशपांडे यांनी त्यांचा प्रसारमाध्यम प्रतिनिधींच्या वतीने विशेष सत्कार केला.

आपल्या सेवेच्या कारकिर्दीत श्री. उर्णे यांनी अतिशय प्रामाणिकपणे आणि तत्पर सेवा बजावली. जिल्ह्यातील सर्वच प्रसारमाध्यम प्रतिनिधी आणि संपादकांशी त्यांचा चांगला संपर्क होता. कार्यालयाच्या वतीने प्र. जिल्हा माहिती अधिकारी दीपक चव्हाण यांनी श्री. उर्णे यांचा सपत्नीक सत्कार केला. माहिती सहायक गणेश फुंदे, सुधीर पवार, संतोष गुजर, धनंजय जगताप, अरुण सोनवणे, चिंतादेवी जयस्वार आदी सहकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती.

◼बातमी संपर्क :९४०५२७०५६० ,९६५७६१२१९६ . ◼इमेल :shrigonda.chandan@gmail.com


Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading