
अहमदनगर, दि. ३१:
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या येथील जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने दिनांक १ ऑगस्ट, २०१८ रोजी प्रसारमाध्यम प्रतिनिधींसाठी फेक न्यूज: परिणाम आणि दक्षता या विषयावरील कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्या हस्ते या कार्यशाळेचे उद्धाटन होणार आहे.
येथील पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये सकाळी १०:३० ते १२:३० या वेळेत ही कार्यशाळा होणार आहे. खोट्या बातम्या पसरवण्यास प्रतिबंध , उपाययोजना, खोट्या बातम्यांच्या प्रसारणामुळे होणारे नुकसान , सोशल मीडियाचा सकारात्मक वापर आदी विषयांवर यावेळी मार्गदर्शन केले जाणार आहे. सायबर तज्ज्ञ नीलेश राळेभात आणि सायबर विषयक कायदा अभ्यासक गजानन फुंदे यांचे मार्गदर्शन होणार आहे. जिल्हा प्रशासन , जिल्हा पोलीस प्रशासन , सायबर पोलीस ठाणे आणि जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अधिकाधिक प्रसारमाध्यम प्रतिनिधींनी या कार्यशाळेसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
◼ बातमी संपर्क :९४०५२७०५६० ,९६५७६१२१९६ . ◼इमेल :shrigonda.chandan@gmail.com.
