
श्रीगोंदा प्रतिनिधी
दिनांक १९ ऑगस्ट रोजी रात्री ९:१५ वाजता पोलीस ठाणे हद्दीत पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार ,सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश कांबळे ,पो.हे.कॉ. अंकुश ढवळे ,चालक औटी ,पो.कॉ. उत्तम राऊत ,दादा टाके ,किरण बोराडे ,विकास वैराळ ,असे सरकारी जीपने आढळगाव ,तांदळी दुमाला ,टाकळी लोणार ,गावचे शिवारात गुन्हे प्रतिबंध कामी गस्त घालत असताना, तांदळी दुमाला ते टाकळी लोणार जाणाऱ्या रोडवर टाकळी लोणार कडे बाभळीच्या झाडाच्या आडोश्याला एक पांढऱ्या रंगाची महिंद्रा पीक अप गाडी नं. एम एच ०४ सी. पी. २४३५ ही संशीयत रित्या ओढ्या जवळ आढळून आली. सदर वाहना जवळ जाऊन पोलिसांनी पाहिले असता.त्या वाहनाच्या क्लिनर बाजूला बसलेले दोन आतील बाजूस बसलेल्या तीन इसमाशी बोलताना आढळले . पोलिसांनी त्यांची विचारपूस केली असता, त्यातील दोन इसम तेथून अंधाराचा फायदा घेत मोटारसायकल वरून पळाले . वाहनातील व्यक्तींची नावे.सुरेश अशोक खंडागळे वय २७ व भाऊसाहेब बाबुराव साखरे वय ४० ,दादा अभिमान पोकळे वय ३५ वर्षें असल्याची त्यानी पोलिसांना सांगितले . सर्व राहणार राजुरी तालुका करमाळा जिल्हा सोलापूर चे ते आहेत . पोलिसांनी त्यांच्या बरोबर विचारपूस केली मात्र चौकशीत असमाधानकारक उत्तर मिळाल्यामुळे, त्यांची झडती घेतली असता, त्यांच्या कडून ,दरोडा टाकण्याचे साहित्य ,२०० ग्रॅम अंबारी मिरची पूड ,लोखंडी कटावणी ,१० मीटर लांबीची नायलॉन दोरी पोलिसांनी हस्तगत केली आहे .त्यांनी सदरचे साहित्य हे तांदळी दुमाला गावात दरोडा टाकण्यासाठी वापरणार असल्याचे कबुल केले आहे.
दरोडा टाकण्याचे साहित्य व हत्यारे श्रीगोंदा पोलीस ठाण्यात आणून त्यांच्याविरुद्ध पो.कॉ. किरण बोराडे यांच्या फिर्यादीवरून गुरनं ४०६/२०१८ भा.दं .वि. ३९९ व ४०२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी अधिक विचारपूस केल्यानंतर त्यांनी टेम्भुर्णी ,बारामती तमाशा थिएटर जवळ विहाळ, जातेगाव ,राजुरी ,आळसुंदे ,खानोरा ,गेटजवळ ,टेम्भुर्णी अकलूज बायपास ,भोळेवाडी ,उंमरड चढावर ,वीज बोर्डा जवळ ,मांगी रोड कडेला ,शेलगाव ,वाशिंबे ,टाकळी कोर्टी ,थेरवडी अश्या वेगवेगळ्या ठिकाणी मोबाईल टॉवरच्या बॅटऱ्या चोरल्याची कबुली दिली आहे . सदर आरोपी सराईत गुन्हेगार असून यांचे अहमदनगर जिल्ह्यासह आसपासच्या जिल्ह्यात अनेक गुन्ह्यात संबंध असण्याची श्यक्यता पोलिसांनी वर्तवली आहे .त्यामुळे तपास करून आणखी गुन्हे उघडकीस होण्याची शक्यता आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा ,अप्पर पोलीस अधीक्षक जयंतकुमार मीना ,उप विभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंडे कर्जत विभाग , यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार व त्यांच्या पथकाने केली आहे.
