
श्रीगोंदा प्रतिनिधी, दिनांक :- २० ऑगस्ट
आज दिनांक २० ऑगस्ट सोमवार रोजी सकाळी श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांच्या हस्ते त्रिशला नितीन शिंदे(अहमदनगर) हिचा सन्मान करण्यात आला. त्रिशला ही अहमदनगर येथील मालिवाडा आगारात क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिस या कंपनीत सफाई कर्मचारी म्हणून काम करीत आहे .दिनांक २ जुलै रोजी रोजच्या कामात कार्यरत असताना तिला एक बेवारस पिशवी आढळून आली होती ,त्या पिशवीत पाहिले असता , लाखों रुपयांचे दागिने होते. मात्र क्षणांचाही विचार न करता किंवा कोणतीही लालूच न बाळगता तिने ती पिशवी तिच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सुपूर्त केली. आगार व्यवस्थापकांना ही माहिती देण्यात आली त्यानुसार पोलीसांच्या मदतीने सदरिल दागिने मूळ मालकाला देण्यात आले.
हालखीच्या परीस्थितीत त्रिशलाने केलेल्या प्रामाणिकपणा बद्दल अनेक सामाजिक स्थरांतून तिचे कौतुक करण्यांत येत आहे.
श्रीगोंदयाचे पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांना सदरील महिलेच्या प्रामाणिक पणाची माहिती वृत्तपत्रांतून प्रकाषीत झालेल्या बातम्यांतुन समजली .त्या अनुषंगाने पोवार यांनी तिच्या चांगुलपणाचे कौतुक करण्याच्या उद्देशाने त्रिशला शिंदे चा पोलीस ठाण्यात सन्मान करण्याचे ठरविले त्यानुसार आज दिनांक २० ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता शाल गुलाबपुष्प व बक्षीस देऊन त्रिशलाचा सन्मान करण्यांत आला. अशी ठराविक माणसे या जगात आहेत, म्हणूनच माणुसकी जिवंत असल्याचे उद्गगार पोवार यांनी याप्रसंगी बोलतांना काढले .यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अनिल ठवाळ व पंचायत समितीच्या सदस्या अनुराधाताई ठवाळ यांनी ही त्रिशला चा शाल आणि श्रीफळ देऊन सन्मान केला . शिवाय बाजीराव पोवार यांचा आणि गोपनीय विभागाचे अविनाश ढेरे यांचाही त्यांनी केलेल्या कामाबद्दल शुभेच्छा देत सन्मान केला .
यावेळी मांडे सर ,जिजाबाप्पू शिंदे ,बंडू कोथिंबीरे ,पत्रकार संजय काटे ,अंकुश तुपे, मच्छीन्द्र सूद्रीक ,सह त्रिशला शिंदे यांच्या कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.
त्रिशला शिंदे चा याआधी १५ ऑगस्ट रोजी कोळगाव ग्रामपंचायत मध्ये सरपंच वर्षा काळे , पंचायत समितीचे सभापती भैय्या लगड ,माजी सभापती बाळासाहेब लगड ,शंकर लगड ,शकुंतला गायकवाड यांनी व अहमदनगर बस आगार व्यवस्थापनाने सत्कार केला आहे .स्नेहालयांतील मोनिका फिसके यांनी शुभेच्छा संदेश देऊन तिचा सन्मान केला आहे . त्याचबरोबर क्रिस्टल कंपनीचे वरिष्ठ अधिकारी नासर देसाई ,सचिन सर ,निलेश आडोळे ,जोशी सर , कानिफनाथ दारकुंडे ,अमर घोडके यांनी तसेच स्वतः कंपनीचे मालक प्रसाद लाड सर यांनीही आभार मानत शुभेच्छा दिल्या आहेत.
