५ मे पासून श्रीगोंदयात १० दिवसांचा जनता कर्फ्यु..

दिनांक ४ मे,श्रीगोंदा:

तालुक्यातील कोरोना प्रादुर्भावाची परिस्थिती पाहता, कोरोना रुग्ण संख्या वाढताना दिसत आहे. रोज रुग्णांचे मृत्यू होत आहेत. हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन हा एकमेव पर्याय असून, जनता कर्फ्यूच्या माध्यमातून श्रीगोंद्यात दहा दिवसांचा लॉकडाऊन करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाचे प्रमुख, तहसीलदार पवार यांनी घेतला आहे. तालुक्यातील सर्व यंत्रणा बंद राहणार असून, या दरम्यान अत्यावश्यक सेवेपैकी मेडिकल, दवाखाने, दूध व पेट्रोल (निर्धारित यंत्रणेसाठी) या व्यतिरिक्त सर्व आस्थापना, व्यवसाय, धंदे बंद राहतील. अशी सूचना तहसीलदारांनी प्रसिद्धीपत्राद्वारे जाहीर केली आहे.

https://bit.ly/bspmycityshrigonda

तहसीलदार तथा इन्सिडेंट कमांडर श्रीगोंदा प्रदीप पवार यांनी प्रसिद्धीस दिलेल्या प्रसिद्धी पत्रात नमूद केले आहे. की, दिनांक ०५/०५/२१ ते १४/०५/२१ पर्यंत १० दिवस तालुक्यात कडकडीत बंद ठेवण्यात येणार आहे. श्रीगोंदा तालुक्यातील वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी व्हावा, या हेतूने जनतेने स्वयंम स्फूर्तीने स्वीकारलेला हा जनता कर्फ्यु लागू करण्यात आलेला असून, या कर्फ्यु दरम्यान फक्त हॉस्पिटल, मेडिकल, पेट्रोल व डिझेल पंप( फक्त अत्यावश्यक सेवांसाठीच) तसेच दूध संकलन, पिण्याचे पाणी सुरू राहतील. या दरम्यान इतर सर्व आस्थापना पूर्णपणे बंद राहतील. (10 days public curfew in Shrigonda from May 5.)

जनता कर्फ्यू दरम्यान कालखंडात कुणीही बाहेर फिरू नये. यापूर्वीच्या अशा निर्णयाला लोकांनी प्रतिसाद दिला असून, या वेळीही सकारात्मक प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा स्थानिक प्रशासनाने व्यक्त केली आहे. या जनता कर्फ्यु दरम्यान नागरिकांनी सहकार्य करावे. असे तहसीलदार प्रदीप पवार यांनी प्रसिद्धी पत्रात नमूद केले आहे.

स्रोत:(तहसीलदार तथा इनसिडेंट कमांडर श्रीगोंदा)

प्रतिकात्मक फोटोचा वापर करण्यात आला आहे.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading