अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी आरोपीस १० वर्षांची सक्तमजुरी..

दिनांक १५ जानेवारी २०२५, श्रीगोंदा:

अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी नकेश उर्फ कृष्णा उर्फ गणेश छबु माळी (वय २१, रा. शेडाळ, ता. आष्टी, जि. बीड) याला जिल्हा व सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश मुजीब शेख यांनी विविध कलमान्वये दहा वर्ष सक्तमजुरी व तीन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. दंड न भरल्यास सहा महिने अतिरिक्त कारावासाची तर लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियमांतर्गत आणखी दहा वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

पीडित मुलगी व तिची आई चिखली येथील शेतमजुरीवर उपजीविका करत होत्या. २० नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी शेतातील कामानंतर पीडित मुलगी आणि तिचा भाऊ घरी परतले; परंतु नंतर ते गायब झाल्याने आईने बेलवंडी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. तपासादरम्यान २५ नोव्हेंबर रोजी पीडित मुलगी व आरोपी चाकोरे (ता. माळशिरस) येथे मिळून आले.

पोलिस तपासात आरोपीने मुलीला नवीन कपडे देण्याचे आमिष दाखवून पळवून नेल्याचे आणि तिच्यावर अत्याचार केल्याचे निष्पन्न झाले.

सरकारी वकील पुष्पा कापसे गायके यांनी खटल्याचे कामकाज पाहिले. १० साक्षीदारांच्या जबाबांनुसार न्यायालयाने आरोपीस दोषी ठरवत शिक्षा सुनावली. पैरवी अधिकारी सुजाता गायकवाड व पोलीस कॉन्स्टेबल आशा खामकर यांनी तपासात योगदान दिले.

स्रोत:(प्रसिद्धी पत्र)

जाहिरात…

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading