दिनांक १६ जानेवारी २०२५,श्रीगोंदा:
तालुक्यातील न. पा. सर्व्हे नंबर १७४९ मधील १० हेक्टर ९२ गुंठे धार्मिक ट्रस्टची जमीन बनावट कागदपत्रांच्या आधारे हस्तांतरित करून बेकायदेशीर विक्री करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

याबाबत सुजित भैरु जाधव, अध्यक्ष, दि-कॉन्फरन्स ऑफ चर्चेस ऑफ क्राइस्ट इन वेस्टर्न इंडिया यांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यांनी सांगितले की, दिपक नामदेव गायकवाड याने २०२३ मध्ये बनावट दस्त तयार करून जमीन हस्तांतरण केले व नंतर २०२४ मध्ये ८ हेक्टर (२० एकर) जमीन बेकायदेशीर विकली.

फिर्यादीनुसार, आरोपींनी शासकीय यंत्रणेच्या मदतीने ट्रस्टची मालमत्ता स्वतःच्या नावे केली. आरोपींमध्ये दिपक गायकवाड, सतिष भालेराव, वैभव पारधे आणि संदिपान तुपारे यांचा समावेश आहे.

या प्रकरणाचा तपास सुरू असून संबंधितांवर फसवणूक व बनावट दस्त निर्मितीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
तर या प्रकरणी मदत करणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी आर्थिक गुन्हे शाखा तसेच लाच लुचपत प्रतिबंधक विभाग यांच्याकडे तक्रारी सादर करत श्रीगोंदा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हे दाखल करण्यासाठी लवकरच आंदोलन सुरू करणार असल्याचे राष्ट्र निर्माण दलाचे अध्यक्ष भालचंद्र सावंत यांनी माध्यमांना सांगितले आहे.
स्रोत:(फिर्याद)


जाहिरात..
