दिनांक १६जानेवारी २०२५,श्रीगोंदा:
श्रीगोंदा येथे सासरच्या लोकांनी विवाहित महिलेला उपाशी ठेवत शिवीगाळ, मारहाण व जिवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार घडला आहे. पतीने तिच्या इच्छेविरुद्ध अनैसर्गिक संबंध ठेवल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

याशिवाय, सासरा व दिर यांनी लज्जास्पद वर्तन करत शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. सासूने तिला कोणत्याही पुरुषासोबत संबंध ठेवून मूल जन्माला घालण्याचा आग्रह केला, मात्र नकार दिल्यावर तिला मारहाण व धमकी दिली.

पिडीत महिलेच्या तक्रारीवरून पती, सासू, सासरा आणि दिर यांच्याविरोधात श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मनोहर खिळदकर करत आहेत.
स्रोत:(फिर्याद)



जाहिरात..
