कामाचे पैसे मागितल्यावर मजुरास जातीवाचक शिवीगाळ व मारहाण..

दिनांक १६ जानेवारी २०२५, श्रीगोंदा:

ससाणेनगर येथे राहणाऱ्या मच्छींद्र ससाणे (वय ४५) यांना त्यांचे मालक भाऊ उर्फ अतुल कोथिंबीरे यांनी पैसे मागितल्यावर जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे.

मच्छींद्र ससाणे यांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, मागील पाच वर्षांपासून ते कोथिंबीरे यांच्या मजुरीच्या कामावर होते. १३ जानेवारी रोजी, त्यांनी त्यांच्या मजुरीचे पैसे मागितले असता, कोथिंबीरे यांनी “तुम्ही मांगाचे लोक जास्त माजलेत” असे म्हणत शिवीगाळ केली व हाताने मारहाण केली. तसेच पप्पू कोथिंबीरे यांनी बांबूने त्यांच्या पायांवर आणि पाठीत मारहाण केली व त्यांचा मोबाईल हिसकावून जमीनीवर आपटला.

यावरून श्रीगोंदा पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीच्या अनुषंगाने ॲट्रॉसिटी सह इतर कलमानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

स्रोत:(फिर्याद)

जाहिरात..

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading