दिनांक २ सप्टेंबर,२०२५ श्रीगोंदा:
तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा दिनांक १ व २ सप्टेंबर २०२५ रोजी परिक्रमा संकुल, काष्टी येथे पार पडल्या.
या स्पर्धेत महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालय, श्रीगोंदा येथील १७ व १९ वर्षे वयोगटातील ग्रीको-रोमन, फ्रीस्टाईल प्रकारातील मुलांनी तसेच १९ वर्षे फ्रीस्टाईल मुलींनी उत्कृष्ट कामगिरी करत एकूण १२ खेळाडूंनी प्रथम क्रमांक पटकावून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली.

या यशस्वी खेळाडूंना क्रीडा शिक्षक संजय डफळ व क्रीडा संचालिका कल्पना बागुल यांचे मार्गदर्शन लाभले.

📌 निकाल पुढीलप्रमाणे:
मुले:
- समद सय्यद – 51 किग्रॅ – प्रथम
- प्रभू जामदार – 55 किग्रॅ – प्रथम
- अभिजीत शेळके – 57 किग्रॅ – प्रथम
- कृष्णा वायकर – 65 किग्रॅ – प्रथम
- संदेश डफळ – 71 किग्रॅ – प्रथम
- संदीप गायकवाड – 77 किग्रॅ – प्रथम
- सार्थक काळे – 80 किग्रॅ – प्रथम
मुली:
- गायत्री हराळ – 53 किग्रॅ – प्रथम
- मानसी धावडे – 55 किग्रॅ – प्रथम
- समीक्षा टोणगे – 62 किग्रॅ – प्रथम
- श्रुतिका पवार – 76 किग्रॅ – प्रथम
- साक्षी डफळ – 73 किग्रॅ – प्रथम

यशस्वी खेळाडूंचे महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन माजी आमदार बबनराव पाचपुते, समिती सदस्य मा. बाबासाहेब भोस, माजी आमदार राहुल जगताप, मा. महावीर पटवा,

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महादेव जरे, उपप्राचार्य डॉ. प्रकाश साळवे, डॉ. सुदाम भुजबळ, डॉ. नितीन थोरात, पर्यवेक्षक रत्नाकर झिटे, जिमखाना प्रमुख प्रा. रमेश थोरात, प्रा. श्रीकांत थोरात तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
स्रोत:(प्रसिद्धी पत्र)
