दिनांक २ सप्टेंबर २०२५,श्रीगोंदा:
श्रीराम मंदिर ट्रस्टच्या वतीने मोफत नेत्र तपासणी, अल्पदरातील मोतीबिंदू शस्त्रक्रिया तसेच मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात विविध क्षेत्रातील नामवंत डॉक्टरांनी सेवा पुरविल्याने नागरिकांना मोठा फायदा झाला.

या शिबिरात डॉ. स्मिता पठारे (वरद नेत्रालय, अहिल्यानगर) यांनी नेत्र तपासणी सेवा दिली. तसेच श्रीगोंद्यातील बालरोग तज्ञ डॉ. प्रमोद गायकवाड, मुळव्याध तज्ज्ञ डॉ. जांभळे, जनरल फिजिशियन डॉ. आशुतोष सदरे, दंतरोग तज्ज्ञ डॉ. अनुप बगाडे, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. प्रीती मस्के यांनी मोफत सल्ला व तपासण्या केल्या.

शिबिराचे उद्घाटन मंगेश घोणे (अध्यक्ष, श्री मार्तंड देवस्थान, जेजुरी) यांच्या हस्ते झाले.

यावेळी नगराध्यक्ष शुभांगीताई पोटे, शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख श्रीमती मिराताई शिंदे, माजी उपनगराध्यक्ष वैशाली नंदकुमार ताडे, माजी नगरसेवक आसिफ इनामदार, शिवसेना तालुकाप्रमुख नंदकुमार ताडे, सुरेश आळेकर, तात्या वडतले, अनिल नन्नवरे, प्रताप ताडे, कांता आमले, नाना लांडे, अनिल सुपेकर, काळुराम ताडे, बाळासाहेब ताडे, संजय पटवा, राजू ताडे, रूपेश ताडे, प्रमुख विश्वस्त शिवराज नंदकुमार ताडे, संतोष शेलार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

या शिबिराला परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. श्रीराम मंदिर ट्रस्टच्या या उपक्रमामुळे सर्वसामान्य नागरिकांना आरोग्य सुविधा सहज आणि परवडणाऱ्या दरात उपलब्ध झाल्या. सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराचे सर्वत्र कौतुक होत आहे.
स्रोत:(प्रसिद्धी पत्र)
