मोटार चोरीच्या संशयावरून आदिवासी दाम्पत्यांला जबरी मारहाण..आरोपी विरोधात एट्रोसिटी नुसार गुन्हा दाखल.

श्रीगोंदा दिनांक २७ फेब्रुवारी:
तालुक्यातील बेलवंडी कोठार येथे वास्तवास असणाऱ्या स्वप्नील चित्रगुण पवार या युवकाला व त्याच्या पत्नीला तळ्यातील मोटार चोरी केल्याच्या संशयावरून,बेलवंडी कोठार येथील रहिवाशी रामा नारायण कोठारे व दीपक नारायण कोठारे, यांनी दिनांक २६ फेब्रुवारी रोजी सकाळी जबर मारहाण केली आहे.या घटनेनंतर पीडित स्वप्निल चित्रगुण पवार याने दिलेल्या फिर्यादीवरून या दोघां आरोपींच्या विरोधात भा.दं.वि.का.कलम ३५४,३२३,५०४,५०६ सह अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम ३(१)(w)(¡)(¡¡) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी या प्रकरणी तात्काळ गुन्हा दाखल केला असल्याचे पीडितांनी माध्यमांना सांगितले आहे.
सविस्तर वृत्त असे की,बेलवंडी कोठार येते आपल्या आई वडील,आजी,आजोबा ,बहीण,भावा सोबत राहत असलेल्या  स्वप्नील व त्याच्या पत्नीला, येथील दीपक व रामा कोठारे यांनी तलावात टाकलेली पाण्याची मोटार चोरली या संशयावरून राग अनावर होऊन, सकाळी प्रातविधीला गेलेल्या स्वप्नीलच्या पत्नीला तळ्यातच आडवत ,आमची मोटार चोरी केली म्हणत,तिला लज्जा उत्पन्न होईल अशा पद्धतीने मारहाण केली.तिने आरडाओरडा केल्यानंतर स्वप्निल पळत जात मारहाण सोडवण्यासाठी मध्ये गेल्यावर त्यालाही जबर मारहाण झाल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
आजही पारधी व आदिवासी समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला नसल्याचे,स्पष्ट होत आहे.श्रीगोंद्यातील आदिवासी व मागासवर्गीय समजावर वारंवार अन्याय अत्याचार झाल्याच्या घटना आपण पाहत आलो आहोत.त्यानुसार,श्रीगोंदा तालुका दलित आदिवासीं अत्याचारांच्या बाबतीत जिल्ह्यासह राज्याच्या पटलावर आल्याचे आपण पाहिलेले आहे.अशा घटनांतून निर्माण होणारे सामाजिक तणाव,सवर्ण समाजाचे पोलिसांच्या कार्यक्षेत्रात गैरसंविधानिक आंदोलने,त्या आंदोलनात दलितविरोधी वक्तव्य,त्यातुन मागासवर्गीयांवर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न.दलितांकडून आंदोलने,त्यात श्रीगोंदा तालुका दलित आदिवासी अत्याचार ग्रस्त तालुका घोषित करण्याची मागणी काही नवीन राहिलेली नाही.या घटनेच्या निमित्ताने पुन्हा, दलित आदिवासी बांधव सुरक्षित नसल्याचे स्पष्ट होत आहे.कारण सदर प्रकरनात स्वप्नील व त्याच्या पत्नीला हाणामार केली जाते,वरून गावातील काही पुढारी पोलिस ठाण्यात स्वप्नीलचा गुन्हा दाखल करन्यास मज्जाव करतात.मात्र पोलीस अधिकार खमक्या असल्याने एट्रोसिटी दाखल केली जाते.घटनेतील पीडित स्वप्निल हा श्रीगोंदा शहरातील एका नामांनकीत महाविद्यालयात प्रथम वर्ष कला शाखेत शिकत असल्याचे समजते आहे.संशयावरून आदिवासीनां मारहाण करण्यात आल्याच्या अनेक घटना श्रीगोंदा कार्यक्षेत्रात घडल्या असल्याचे नवीन नाही .

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading