श्रीगोंदा पोलिसांची सांगवीत वाळूवर तर काष्टीत बिंगो व कल्याण जुगारवर कारवाई…

सांगवी,काष्टी, श्रीगोंदा दिनांक २७ फेब्रुवारी:
श्रीगोंदा तालुक्यात सांगवी व भीमा नदी पात्रात बहुतेक  ठिकाणी अनधिकृत वाळू व अवैध धंदे चालू असल्याचे काही संघटनांनी स्थानिक प्रशासनाला निवेदन सादर केले होते.त्यानुसार माध्यमातून याविषयी वारंवार या धंद्यांना बंद करण्याचे आव्हान केल्याचे प्रसिध्द करण्यात आले.
यानंतर दिनांक २६ फेब्रुवारी रोजी श्रीगोंदा पोलिसांनी सांगवी दुमाला परिसरात नदी पात्रात अवैध वाळू उपसा करीत असलेल्या, आप्पा पांढुरंग राठोड, राहणार सोनेवाडी, दौंड,याची ट्रक क्र. एम.एच.४२ बी.०७८६,व ज्ञानेश्वर यशवंत मदने राहणार सांगवी दुमाला ट्रक क्र. एम.एच.१२ इ.एफ.३५७७ यातून विना परवाना वाहतूक करीत असलेली वाळू व मुद्देमाल सह तीन ब्रास वाळू ,किंमत अंदाजे ९ हजार रुपये तर दुसऱ्या ट्रक मधून ९ हजार रुपये किमतीची वाळू ट्रक सह जप्त केली आहे.त्याचबरोबर सक्षेशन बोटिला जाग्यावरून हलवने शक्य नसल्याने , जिलेटिन च्या साहाय्याने स्फोट करून तिला जागेवरच नष्ट करन्यात आले असल्याचे श्रीगोंदा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार समजले आहे.असा एकूण १५ लाख ४० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल स्थानिक पोलीसांनी हस्तगत केला असून,यांच्यावर गुरनं आय/२०१९ कलम ३७९,३४,पर्या.३/१५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी पो.कॉ. अमोल श्रीरंग आजबे यांनी पोलिसांच्या वतीने फिर्याद दिली असुन,पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव पुढील तपास करीत आहेत.
दिनांक २६ फेब्रुवारी रोजी रात्री ९:३० वाजनेच्या सुमारास या कारवाई बरोबरच श्रीगोंद्यातील काष्टी येथील एका पत्राच्या शेड मध्ये अनधिकृत चालू असलेल्या,बिंगो नावाच्या जुगारवरही श्रीगोंदा पोलिसांनी कारवाई केली आहे.यात रोख रक्कम १० हजार ५०० रुपये व बिंगो जुगाराचे साहित्य ताब्यात घेऊन,फिर्यादी पो.कॉ. दादासाहेब भाऊसाहेब टाके यांच्या फिर्यादीवरून आरोपी दत्तात्रय बाळासाहेब वाडगे, दत्ता अशोक गायकवाड, संजय जयंत आढाव,व राजू कैलास खरात सर्व राहणार काष्टी यांच्यावर गुरनं आय २०७/मुंबई जुगार कायदा कलम १२(अ)प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून,आरोपी दिनांक २७ फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आले आहेत.पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई गजानन बोडके करीत आहेत.तशेच काष्टी गावात दत्त मंदिराच्या बाजूला टपरीत आडोश्याला विना परवाना सोरट नावाचा जुगार पैश्यावर खेळत असताना,गुलाब फक्कुद्दीन शेख या इसमाला पोलीसांनी ताब्यात घेऊन त्याच्याकडून ६५० रुपये व जुगाराचे साहित्य हस्तगत करून गुरनं ¡¡/२०१९ मुंबई जुगार कायदा कलम १२(अ)नुसार गुन्हा दाखल केला आला आहे.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading