पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांची अवैध धंद्यावर मोठी कारवाई…
श्रीगोंदा दिनांक ९ मार्च:
श्रीगोंदा तालुक्यातील श्रीगोंदा कारखाना येथे दि.९ मार्च राेजी पहाटे ४:०० वा चे सुमारास श्रीगाेंदा पाेलीस स्टेशन हद्दीतील कारखाना येथील गाेपाळवस्ती व काष्टी येथील जामदार मळा येथे अवैद्य गावठी हातभट्टी दारु तयार करणाऱ्या भट्टयावर पोलिसांनी छापा टाकला असता,याठिकाणी २०२०००- रु किं.ची गावठी हातभट्टी दारु तयार करण्याचे कच्चे रसायन व गावठी हातभट्टी दारु एकुण ३९७९ लिटर हे नष्ट करुन हातभट्टी दारु तयार करण्याचे साहीत्य सामुग्री जागीच नष्ट केली आहे.
छाप्या दरम्यान आराेपी नामे १.राहुल पाेपट गव्हाणे २.अविनाश संताेष पवार ३.अमाेल जंबाे गी-हे ४.विमल जंबाे गि-हे ५.जंबाे पंढरीनाथ गि-हे ६. सुनिता अंकुश पवार सर्व रा.श्रीगाेंदा कारखाना ता.श्रीगाेंदा,तसेच ७.संदीप पाेपट्या पवार रा.जामदार मळा, काष्टी अशांना ताब्यात घेवुन त्यांचेवर मुंबई दारुबंदी कायदा कलम ६५ (फ)(क)(ड)(ई) प्रमाणे गुन्हे दाखल केले आहेत.
श्रीगोंदा पोलिसांनी अवैध धंदे व गावठी दारू बंदी ची मोठ्या प्रमाणात मोहीम राबवली असून, रात्रीत अवैध गावठी दारूवरची ही चौथी कारवाई आहे.त्याचबरोबर बिंगो गेम आणि जुगार यावर श्रीगोंदा कार्यक्षेत्रात पूर्ण बंदीचे वातावरण निर्माण झाले आहे .काल रात्री दिनांक ८ मार्च पोलिसांनी केलेल्या वेगवेगळ्या दोन कारवाईत १४ आरोपी ताब्यात घेत ७०१८० रु.सह मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कारवाई (पाेलीस अधिक्षक )इशू सिंधु ,(अपर पाेलीस अधिक्षक ),सागर पाटील (उपविभागीय पाेलीस अधिकारी )अरून जगताप यांचे मार्गदर्शनाखाली (पाे.नि.)दाैलतरावजाधव,(पाेसई)कर्णवार,(पाेसई)बाेडके,(सहा.फाैज.)अनिल भारती,(पाे.हे.कॉ.)खेडकर,(पाे.हे.को).बडे,(पाे.ना.)वैराऴ,(पाे.काँ).टाके,(पाे.काँ).रविजाधव,(पाे.काँ).बाेराडें,(पाे.काँ). आजबे, (पाे.घाेऴवे (पाे.कॉ.)देवकातें,(पाे.काँ).काेपनर (पाे.काँ).बेल्हेकर,(पाे.काँ).दंदाडे,(पाे.काँ).धांडे (मपाेकाँ).वलवे,(म.पाे.काँ)बजंगे (म.पाे.काँ). भंडलकर व (महीला आर.सी.पी.प्लाटुन अ.नगर) यांनी केली आहे .