आगार व्यवस्थापक शिंदे व वाहतूक निरीक्षक रोकडे यांच्या मनमानी,जुलमी व मुजोर कारभाराला कंटाळून कर्मचारी मुला-बाळांसह आगाराच्या दारात करणार उपोषण…
श्रीगोंदा दिनांक १० ,मार्च :
आगारात नव्याने रुजू झालेले आगार व्यवस्थापक प्रवीण शिंदे व वाहतूक निरीक्षक रोकडे हे तरुण अधिकारी श्रीगोंदा आगाराला लाभले आहेत.दोन्ही अधिकारी जिल्ह्यातीलच आहेत. मात्र कार्यक्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सामान्य व प्रामाणिक तशेच मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना यांच्या करवी चांगली वागणूक मिळत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.वर्ग चार च्या कर्मचाऱ्यांना या अधिकाऱ्यांकडून अतिशय निंदनीय व खालच्या पातळीची वागणूक मिळत असल्याचे समोर आले आहे.मागासवर्गीय महिलां कर्मचाऱ्यांची मानसिक पिळवणूक करणे ,त्यांना सोईनुसार काम नेमून न देता त्यांना येण्या जाण्यास त्रास होईल, किंवा संध्याकाळ होईल.दिवस भर कामाच्या त्रासाबरोबर,कर्मचाऱ्यांची शारीरिक हेळसांड होईल,अश्या पद्धतीने त्यांना वागणूक देऊन ड्यूटी नेमून देने.पैसे घेत काहींना सोईस्कर ड्युटी देने.कर्मचाऱ्यांवर दडपशाही निर्माण करणे,त्यांना मानसिक त्रास देने.कर्मचाऱ्यांना मच्छर,ढेकूण,डास संबोधत , दिलेल्या ड्युटी करा नाहीतर औषध पिऊन मरा !नसेल जमत तर, राजीनामा देऊन घरी बसा !असा सज्जड दम देत,आपल्या अधिकाराचा गैर वापर करीत असल्याची तक्रार महाराष्ट्र एस.टी. कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी (परिवहनमंत्री) दिवाकर रावते,कामगार अधिकारी रा.प.अहमदनगर, सुरक्षा अधिकारी रा.प.अहमदनगर, अध्यक्ष व सचिव कामगार सेना अहमदनगर,हिरेनजी रेडकर (सरचिटणीस कामगार सेना मुंबई), तशेच आगार व्यवस्थापक,रा.प.आगार श्रीगोंदा यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे,सविस्तर वृत्त असे की,श्रीगोंदा आगार हे उत्पन्ना बरोबर प्रवाश्यांना सेवा देण्याच्या दृष्टीने कमी पडत आहे.आगार व्यवस्थापक प्रवीण शिंदे व स्थानक प्रमुख रोकडे हे अधिकारी बालीश असून,उत्पन्न वाढीच्या बाबतीत कोणतेही ठोस पावले उचलण्याची यांची मानसिकता नाही.शिवाय त्यांच्या हाताखाली असणाऱ्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांना ते अतिशय जुलमी व गुलामगिरी ची वागणूक देत,त्यांना मानसिक त्रास देऊन त्यांच्याकडून काम करून घेत असल्याच्या तक्रारी आहेत.शेतातील सालगड्या सारखे ते चालक व वाहक यांच्याशी बरताव करतात.त्यांना अपमानित करीत मच्छर,डास ढेकूण अश्या नावाने आवाज देतात. पीडित चालक व वाहकाची कोणत्याही प्रकारची अडचण व तक्रार ऐकली जात नसल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.मर्जीतील कर्मचाऱ्यांना प्रेमाने व त्यांच्याकडून पैश्याची लाच घेऊन त्यांना ड्युटी नेमून देतात.मागासवर्गीय महिला व कर्मचारी वाहक ,चालकांची मानसिक व शारीरिक हेळसांड केली जाते.नुकताच एका मागासवर्गीय चालकाने आगारात विष प्राशन करण्याचा प्रयत्न केला असल्याची ,विश्वनिय महिती समजली आहे.प्रवीण शिंदे व रोकडे तशेच मग्रूर व या नमूद अधिकाऱ्यांच्या वश मध्ये असलेला दलाल ढवळे हा, चालक वाहकांची टी.9 ची सोईस्कर ड्युटी काढून मर्जीतल्या लोकांकडून पैशे घेऊन,कामगिरी लावत असल्याचा अनेकांचा व विशेषतः कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांचा लेखी आरोप आहे.
रोकडे तर राजपत्रीत अधिकाऱ्यांच्या अविर्भावात असल्या प्रमाणे कर्मचाऱ्यांना वागणूक देत असल्याचे बोलले जात आहे.चालकांना हा अधिकारी अजिबात माणसा प्रमाणे बोलतं नसल्याचे अर्जात नमूद केले आहे.जसे की,”मी सांगेन तीच ड्युटी करायची ! नाहीतर औषध पिऊन मरायचे ,आणि जमत नसेल ना? तर,राजीनामा देऊन घरी बसायचे” अशी अरेरावीची भाषा वापरत,रोकडे आगारात दडपशाही करीत आहे.यांच्या विषयी वरिष्ठ अधिकारी म्हणजे आगार व्यवस्थापक प्रवीण शिंदे यांच्या शी बोलण्याचा प्रयत्न केला तर,ते यात माझा काही सबंध नाही म्हणतात,शिवाय रोकडे नांच भेटा म्हणून कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण करतात.
यापूर्वी रोकडे आणि ढवळे यांनी दारू पिलेल्या चालकाला कामगीरी वर पाठवले होते,एकदा आगारातील एका बस मध्ये मागील सीट वर महिला व पुरुषा चे आंतर वस्त्रे मिळाली होती, त्यावर शिंदे यांनी उडवा उडवा उडवीची उत्तरे दिली होती, आगारातील एका बसचे मागील चाक निसटून बऱ्याच दूर जाऊन पडले.तरी,चालकला माहीत झाले नाही.शेजारी चाललेल्या एका गाडी चालकाने त्याला ओरडून सांगितले तेंव्हा त्याने गाडी थांबवली.त्यानेही मद्यपान केले असल्याचे प्रवाश्यांनी सांगितले.
वरील नमूद घटनांचा सारांश असा आहे की,वरिष्ठ अधिकारी म्हणवणारे आगार व्यवस्थापक प्रवीण शिंदे,स्थानक निरीक्षक रोकडे व स्थानक नियंत्रक ढवळे यांचे दडपशाही व मग्रूर शाही मुळे श्रीगोंदा आगारात दहशतिचे वातावरण निर्माण झाले आहे.यां अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळुन यापूर्वी एका मागासवर्गीय चालकाने विष प्राशन करण्याचा प्रयत्न केला होता.तसाच प्रयत्न करण्याचा किंवा त्या दिशेने पाऊल उचलण्याच्या मानसिकतेत बरेच मानसिक हेळसांड झालेले वाहक व चालक आहेत.
या नुमद अधिकऱ्यां मुळे श्रीगोंदा आगाराची बदनामी होत असून,यात एस.टी.ची प्रतिमा मलिन होत आहे.त्याचबरोबर शिंदे,रोकडे व ढवळे हे एस.टी.च्या उत्पन्न वाढीच्या हिताचे नसून,या अधिकाऱ्यांबरोबर यांच्या वतीच्या लाचार कर्मचाऱ्यांची बदली करण्यात यावी.अशीही काही संघटना मागणी करीत आहेत. तशेच मागासवर्गीय कर्मचारी व अधिकारी यांच्या कामांवर जातीवादी धोरणातून गदा आणणाऱ्या असल्या अधिकाऱ्यांवर उपोषणास,मोठे आंदोलन उभा करून,बदलीची मागणी काही मागासवर्गीय, आदिवासी,भटक्या विमुक्त संघटनेच्या वतीने होत आहे . तशेच डेमोक्रॅटिक युथ फॉर इंडिया या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष भालचंद्र सावंत हेही नमूद सर्व विषयांवर लवकरच दिवाकर रावते(परिवहनमंत्री,महा.राज्य) तशेच एम.डी. साहेब (परिवहन महामंडळ)यांना भेटणार असल्याचे त्यांनी माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत नमूद केले आहे.