श्रीगोंदा आगारात महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान करून,जागतिक महिला दिन साजरा..

श्रीगोंदा दिनांक १२ मार्च :
श्रीगोंदा बस आगारात दिनांक ११ मार्च रोजी दुपारी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत(आगार व्यवस्थापक) प्रवीण शिंदे,(सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक) प्रशांत होले, व श्रीगोंदा नगरपालिकेच्या विद्यमान (नगरसेविका) सौ.सोनाली हृदय घोडके यांच्या सह मान्यवरांच्या उपस्थितीत आगारात कार्यरत असणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांचा शाल,नारळ व गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते भारत घोडके,दीपक घोडके,पप्पू घोडके,हृदय घोडके,सह आगारातील कर्मचारी सुनील कपाळे,बाळासाहेब वाघ, सह महिला कर्माचरी व सफाई कामगार उपस्थित होते.
यावेळी (आगार व्यवस्थापक) प्रवीण शिंदे यांनी श्रीगोंदा आगाराच्या वतीने उपस्थितांना महिला दिनाचे महत्व सांगत जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.त्याचबरोबर श्रीगोंदा नगरपालिकेच्या वतीने सौ.सोनाली हृदय घोडके यांनीही महिला दिनानिमित्त मार्गदर्शन करीत,उपस्थित महिलांचा शाल व पुष्पगुच्छ देत सन्मान केला.प्रशांत होले यांनी उपस्थित मान्यवरांचे आगाराच्या वतीने आभार मानले व कार्यक्रम संपन्न झाला.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading