श्रीगोंदा नगरपालिकेमध्ये बार्शी पटर्न राबविण्याची राजेश डांगेंची मागणी..

श्रीगोंदा नगरपालिकेमध्ये बार्शी पटर्न राबविण्याची राजेश डांगेंची मागणी..

श्रीगोंदा दिनांक ९ मार्च :

नागरीक व घंटागाडीच्या समन्वय अभावी, कचरा समस्येवर उपाय म्हणुन, बार्शी न.पा.प्रमाणे घंटागाडी सुरु करण्याची मागणी नदरसभा आदोंलन अध्यक्ष राजेश डांगे यांनी केली आहे.त्यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, कचराकुंडी ऐवजी कचरा व्यवस्थापनासाठी घंटागाडी चांगला पर्याय आहे. पण,कचरा वाहतुक करणारी घंटागाडी एकाच ठीकाणी जादा वेळ थांबल्याने, पुढील गल्लीतील नागरीकांना कचरा डबा/बादली घेऊन थांबावे लागते.तर, काही वेळा घंटागाडी न थांबता निघुन गेल्याने,नागरीकांची गैरसोय होते.याला पर्याय म्हणुन,सोलापूर जिल्ह्यातील बार्शी नगरपालिकेने उपाय शोधला असुन,नागरीक कचरा डबा/बादली घराबाहेर ठेवतात.घंटागाडी वरील कर्मचारी सर्व डबे,बादली ओतुन पुन्हां जागेवर नेऊन ठेवतो.त्यामुळे, नागरीकांचा वेळ वाचतो.यामुळे घंटागाडी कर्मचाऱ्यांना देखील एकाद्या ठिकाणी नागरीकांची वाट पाहत थांबावे लागत नाही.
त्यावर उपाय म्हणुन,श्रीगोंदा शहरात देखील नागरीकांना या समस्येचा सामना दररोज करावा लागत असल्याने,श्रीगोंदा नगरपालिके मध्ये बार्शी पटर्न राबविण्याची मागणी (नगरसभा आंदोलन,अध्यक्ष) राजेश डांगे यांनी  श्रीगोंदा नगरपालीके कडे केली असल्याचे माध्यमांना दिलेल्या प्रसिद्धी पत्रात केली आहे.

Leave a Reply