तांदळी येथील रस्त्यांच्या विकासासाठी २ कोटी ४५ लक्ष निधी मंजूर; विक्रमसिंह पाचपुते यांच्या हस्ते भूमिपूजन.

दिनांक ८ जुलै २०२४, श्रीगोंदा:

आज श्रीगोंदा व नगर विधानसभा मतदारसंघातील श्रीगोंदा तालुक्यातील तांदळी येथे सार्वजनिक बांधकाम विभाग, अहमदनगर द्वारे तांदळी दुमाला ते वाघजाई रस्ता (२ किमी) तसेच भानगाव ते टकले वस्ती (२ किमी) रस्ता खडीकरण व डांबरीकरण करण्यासाठी २ कोटी ४५ लक्ष रुपये निधी मंजूर झाला होता.

या निधीच्या मंजुरीसाठी लोकनेते, माजी मंत्री व विद्यमान आमदार श्री बबनरावजी पाचपुते साहेब यांच्या प्रयत्नांचे योगदान आहे. आज प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली असून, युवा नेते भाजपा प्रदेश उपाध्यक्ष श्री विक्रमसिंह बबनरावजी पाचपुते यांच्या हस्ते नारळ फोडून भूमिपूजन करण्यात आले.

या कार्यक्रमास तांदळी व परीसरातील प्रमुख मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी विक्रमसिंह पाचपुते यांनी गावातील मंदिरात बैठक घेतली तसेच शाळेला भेट दिली.

स्रोत:(राजेंद्र उकांडे)

जाहिरात…

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading