दिनांक ८ जुलै २०२४, श्रीगोंदा:
तांदळी दुमाला ग्रामपंचायतचे लोकनियुक्त सरपंच संजय निगडे, उपसरपंच तुषार धावडे, माजी उपसरपंच राजेंद्र भोसले आणि ग्रामपंचायत सदस्यांनी गावातील विकास कामांचा धडाका सुरू ठेवला आहे. माननीय आमदार बबनदादा पाचपुते यांच्या सहाय्याने गंगाधरे वस्ती रोडच्या डांबरीकरणासाठी १ कोटी ६३ लाख रुपये निधी प्राप्त केला आहे. आज या रोडच्या कामाचे भूमिपूजन तालुक्याचे युवा नेते विक्रम दादा पाचपुते यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी गावातील सर्व आजी-माजी पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. माननीय आमदार बबनदादा पाचपुते यांच्या मदतीने विकास कामांचा निधी मिळवून, गावाची मूलभूत विकासाच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. विक्रम दादा पाचपुते यांच्या सहाय्याने आणखी काही भरीव निधी मिळवण्यासाठी ग्रामपंचायतची संपूर्ण टीम प्रयत्नशील आहे. या विकास कामांसाठी ग्रामपंचायतचे सर्व पदाधिकारी आणि ग्रामस्थांचे मोलाचे योगदान मिळत आहे.
यावेळी संजय निगडे (लोकनियुक्त सरपंच), तुषार धावडे (उपसरपंच), राजेंद्र भोस (माजी उपसरपंच), महेश भोस (माजी उपसरपंच), संतोष हराळ (ग्रा.सदस्य), नर्सिंग भोस (सदस्य), भरत शेळके (सदस्य), नानासाहेब हराळ (संचालक), संदीप रोडे (यात्रा कमिटी अध्यक्ष), हावसरव बोरुडे (माजी सरपंच), देविदास भोस (माजी सरपंच), अनिल शेळके (पो.पाटील), लक्षिमन भोस (मा.सदस्य), ह.भ.प. आबासाहेब नवले, दत्ता अबा भोस, अनिल गंगाधरे, भाऊसाहेब धालवडे सह ग्रामस्थ उपस्थित होते.
स्रोत:(आयोजीत कार्यक्रम)




जाहिरात..
