दिनांक ७ जुलै २०२४, श्रीगोंदा:
आज दिनांक ७ जुलै २०२४ रोजी श्रीगोंदा पोलीस ठाणे हद्दीत चोरीचा गुन्हा घडला असून, बी.एन.एस. ३०३(२) प्रमाणे हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
फिर्यादी वसंत बापुराव चव्हाण (वय ५५ वर्षे), धंदा शेती, राहणार घुगलवडगाव, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर यांनी तक्रार दाखल केली आहे की ५ जुलै २०२४ रोजी पहाटे १:४५ ते ४:०० या वेळेत त्यांच्या घरासमोरून तीन काळ्या रंगाच्या शेळ्या चोरीस गेल्या आहेत. या शेळ्यांची अंदाजे किंमत ३०,००० रुपये आहे.
चोरीचा गुन्हा दाखल केल्यानंतर तपासाची जबाबदारी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी म्हणून पोना. संग्राम जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
फिर्यादीच्या तक्रारीनुसार, अज्ञात चोरट्यांनी शेळ्या लबाडीच्या इराद्याने स्वतःच्या फायद्यासाठी चोरून नेल्या आहेत. या प्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात स.फौ. भैलुमे यांनी गुन्हा नोंदवला आहे.
स्रोत: (फिर्याद)





