पोटच्या पोरीचे हृदय आणि फुफ्फुसे बदलण्यासाठी मजूर बापाची मदतीसाठी आर्त हाक…उपचारासाठी ३० लाखांचा खर्च…

श्रीगोंदा दिनांक २९ एप्रिल:

श्रीगोंदा शहरातील औटीवाडी परिसरात वास्तव्यास असणारे,रामदास हौसराव औटी हे आपला मुलगा व तीन मुलींना सांभाळण्यासाठी श्रीगोंदा तालुक्यातील एका सहकारी साखर कारखान्यात बरीच वर्षे मजूरी करीत होते.ते गेल्या वर्षी सेवा निवृत्ती झाले.त्यांनी त्यांच्या कार्यकाळात त्यांच्या दोन मुली व मुलगा यांचा विवाह करून त्यांच्या कर्तव्यातून उतराई होतांना,त्यांची १० वी शिकलेली शेवटची व धाकटी मुलगी रुपाली (वय वर्षे २५) हिच्या विवाहाचे स्वप्न बघत असतांनाच,रुपालिचा लहानपणीचा आजार वाढल्याचे निदर्शनास आले.
लहान असतांना झालेला आजार आज उद्भवला.याविषयी रूपालीच्या वडिलांनी माध्यमांना माहिती दिली की, वयाच्या सहाव्या वर्षी रुपालीच्या हृदयाला बारीक छिद्र असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.त्यावेळी तिला पुण्यातील नामांकित रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.त्यावेळी तेथील डॉक्टरांनी औषधाचा कोर्स केल्यास पुढे काही त्रास होणार नसल्याचे सांगितले. त्यानुसार रोज गोळ्या व औषध सुरू झाल्या. वयाच्या २५ वर्षांपर्यंत रुपालिला कोणताही त्रास झाला नाही. मात्र,अचानक गेल्या दोन-तीन महिन्यांपासून तिला थकवा, चक्कर व दम लागणे असे लक्षण दिसू लागले.त्यावर घरच्यांनी स्थानिक डॉक्टरांना दाखवले.त्यांनी तिला मोठ्या दवाखान्यात तात्काळ हलविण्याचे कुटुंबातील लोकांना सांगितले.
त्यानुसार रुपालिला मुंबई येथील दवाखान्यात दाखल केले. तपासणी नंतर रुपाली गंभीर आजाराने पीडित असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.शिवाय तात्काळ तिचे हृदय आणि फुफ्फुसे बदलावे लागणार असल्याचे स्पष्ट केले.यासाठी मोठा खर्च लागणार असल्याचेही त्यांनी सांगितले. कुटुंबांवर मोठे संकट कोसळल्याची अनुभूती झाली.यासाठी मोठी रक्कम जमविणे परस्थिती नुसार कठीण होते.
कारण,अल्पभुधारक असल्याने कुटुंब निर्वाहासाठी पत्करलेल्या मजुरीच्या जोरावर दोन मुली आणि मुलगा यांचे संगोपन, त्यांचे लग्न, रुपालीच्या औषध उपचारासाठी झगडनाऱ्या आई वडिलांचा जीवनसंघर्ष,त्यात उद्भवलेली दुष्काळी परस्थिती,वडील रामदास व आई सुशीला यांच्या साठी एक मोठे आवाहन बनली आहे.मुलीला रोज लागणारे औषध वेळेत न मिळाल्यास तिच्या जीवाची होणारी तगमग आई वडीलांना मरण कळा देत आहेत.पोटच्या पोरीचा जीव वाचवण्यासाठी वडील रामदास यांनी माणुसकीच्या दृष्टीने व मुलीच्या प्रेमापोटी सामान्य जनतेला मदतीचे आवाहन केले आहे.
या आजारातून रुपालीला वाचवण्यासाठी तिचे हृदय व फुफ्फुसे बदलावे लागणार असून,त्यासाठी ३० लाख रुपये खर्च,दवाखाना व्यवस्थापनाने सांगितला आहे.यासाठी सढळ हाताने माझ्या मुलीच्या उपचारासाठी मदत करावी.असे आवाहन मुलीच्या आई वडिलांनी केले आहे.
मोबाईल क्रमांक ९६५७४०१७७७ ,८८५५०१७६०४,८६००४१०५०५ यावर संपर्क करावा.किंवा acccount number : 2568101024246 ,IFSC CODE :CNRB0002568 या बँक खात्यात मदत निधी म्हणून जमा करावा अशी विनंती रुपालीच्या आई वडिलांनी केली आहे.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading