सी.आर.पी.एफ.जवान चंद्रकांत राऊत यांचा उस्माघाताने मृत्यू…

img-20190430-wa0035735509588751401263.jpg

श्रीगोंदा दिनांक ३० एप्रिल:
श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव येथील रहिवाशी चंद्रकांत सूर्यभान(आण्णा)राऊत या ३६ वर्षीय व्यक्तीचे काल दिनांक २९ एप्रिल रोजी संध्याकाळी श्रीगोंदा येथील मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये निधन झाले.डॉक्टरांच्या प्राथमिक निरीक्षणात चंद्रकांतचा उस्माघाताने मृत्यू झाल्याचे समोर येत आहे.
चंद्रकांत राऊत हे सी.आर.पी.एफ.मध्ये कार्यरत होते.त्यांनी साधारण ११-१२ वर्षांची सेवा केली आहे.मात्र,काही तांत्रिक अडचणी मुळे,गेल्या ६ वर्षांपासून चंद्रकांत पुन्हा आपल्या कर्तव्यावर हजर झाले नाहीत.दरम्यान आपल्या कुटुंबाचे उदरनिर्वाह करण्यासाठी हा जवान अक्षरशः लाईट पोलचे खड्डे खंदत होता.काल दिनांक २९ एप्रिल रोजी आपले नियोजित काम आटोपून,घरी आल्यावर त्यांच्या पोटात व छातीत जळजळ होऊ लागल्याचे समजते आहे.त्यानुसार सायंकाळी सहा-सात वाजनेच्या दरम्यान स्थानिक कार्यकर्ते,मित्र व संबंधितांच्या मदतीने चंद्रकांतला श्रीगोंदा येथील मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.मात्र,तेथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
आज सकाळी मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले.तशेच, दुपारी पेडगाव येथे भीमा नदीतीरी शोकाकुल वातावरणात चंद्रकांतवर अंत्यसंस्कार करण्यात आले.चंद्रकांत च्या मागे त्यांची पत्नी, एक ८ वर्षाची मुलगी,वृद्ध आई वडील व मोठा भाऊ असा परिवार आहे. कुटुंबाच्या प्रेमापोटी चंद्रकांत वारंवार घरी येत असे.त्यांचा मोठा मित्रपरिवार होता.सर्वांना सामावून घेण्याची त्यांची ख्याती होती.मात्र या संघर्षात कामावर अडचणी निर्माण झाल्या आणि एका सी.आर.पी.एफ.च्या जवानाला लाईटचे पोल उभा करणे,तारा ओढणे,त्यासाठी खड्डे घेणे अशी कष्ठाची कामे करावी लागली.आणि त्यांनी ती केली ही !चंद्रकांच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
या अंत्यविधिस श्रीगोंदा पंचायत समितीच्या उप सभापती पती झिटे,गोधडे भाऊसाहेब,पांक्रोशीतील लोक व समाज बांधवांसह मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading