मिळालेल्या माहितीनुसार दिनांक २५ एप्रिल रोजी मांडवगण गोसावी वाडी येथील तुकाराम आनंदा लोटके या शेतक-याच्या छपराला आग लागून १० शेळ्या मरण पावल्या आहेत.त्याचबरोबर घरातील जीवनावश्यक वस्तु जळून गेल्या असल्याचे समजते आहे.सपरातील चूलीमुळे ही आग लागल्याचा अंदाज आहे. या घटनेनंतर मांडवगणचे तलाठी रूषीकेश खताळ , पशुवैद्यकीय अधिकारी पी.एस.कुसाळकर व ग्रा.पं.सदस्य दत्ता घाडगे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे.
या पीडित कुटुंबासाठी सोसिअल मीडियाच्या माध्यमातून कल्पवृक्ष फौंडेशनचे अध्यक्ष निलेश बोरूडे यांनी मदतीचे आवाहन केले होते.त्या माध्यमातून आतापर्यंत ११०००/- रूपये मदत जमा झाली असून, प्रशासकीय मदत लवकरात लवकर मिळावी ही या पीडित लोटके कुटुंबियांची मागणी आहे.