श्रीगोंद्यात एका हॉटेलांतील गुलाबजाम खाल्याने तांदळी येथील चार लहान मुलांना व वयोवृद्ध महिलेला उलट्यांचा त्रास…

श्रीगोंदा दिनांक २७ एप्रिल:
श्रीगोंदा शहरांत शनिचौक येथील एका नामांकित हॉटेलात काल दिनांक २६ एप्रिल रोजी,तांदळी येथील एका कुटुंबातील काहींनी अर्धा किलो गुलाबजाम पार्सल घेतले. संध्याकाळी घरी गेल्यावर,चार लहान मुलांनी व एका वृद्ध आजीने ते खाल्याने त्यांना उलटया व मळमळीचा त्रास झाला.त्यावर त्यांनी त्या सर्वांना श्रीगोंदा येथील एका दवाखान्यात भरती केले.त्यांच्यावर शहरातील एका मोठ्या दवाखान्यात उपचार चालू असल्याचे समजले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार आज दिनांक २७ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजनेच्या सुमारास सदर घटनेतील पीडित,शहरातील त्या हॉटेल मालकाकडे या घटने विषयी माहिती सांगण्यासाठी गेले होते.मात्र सदर हॉटेल मालकाने त्यांचे एकही न ऐकता त्यांना अरेरावी करीत तिथून हुसकून लावल्याचे,त्या पीडित कुटुंबातील लोकांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे. पीडित कुटुंबातील लोक या हॉटेल मालकाला विचारांना करीत असताना बघ्यांची मोठी गर्दी जमा झाली होती.त्यामुळे माध्यम प्रतिनिधींच्या निदर्शनास हा विषय आला.आज त्या आजींना उपचारात बरे वाटत असल्याचे पीडित कुटुंबातील लोकांकडून समजले आहे.
श्रीगोंदा शहरासह तालुक्यात अश्या प्रकारे शिळे व खाण्या योग्य नसणारे पदार्थ विक्री होत असल्याचे,निदर्शनास येत आहे.अन्न व औषध प्रशासन,अहमदनगर(फूड अँड ड्रग अडमिनिस्ट्रेशन,अहमदनगर) यांचे मार्गदर्शन(सुरक्षित व आरोग्यदायी अन्न पदार्थ उपलब्ध करुन देणे.अन्न व्यावसायिकांसाठी अन्न सुरक्षा व्यवस्थापन प्रणालीचा वापर करणे. सर्व अन्न व्यवसायांसाठी परवाना अथवा नोंदणी ईत्यादी)व भेट येथील दुकानदार व हॉटेल चालकांना अजून तरी झाल्याचे निष्पन्न नाही.असे या घटनेनंतर निदर्शनास आले आहे. परप्रांतीय लोकांचे स्वीट होम,वडापाव सेंटर,जिलेबी दुकान,पान स्टोल मधील नशैल पदार्थ,गुटखा,चैनी,तंबाखूजन्य पदार्थ, मावा, तशेच पिकवलेली फळ,अवैद्य जार पाणी विक्री याचं बरोबर हॉटेल,चहा दुकानदार यांच्या उत्पादनाची शुद्धता आणि खात्री करण्यासाठी या अन्न व औषध प्रशासन कार्यलयाचे कोणी प्रतिनिधी श्रीगोंदा येथे आजपर्यंत आल्याचे दिसून आले नाहीत.
त्यामुळे प्रशासनाचेच या सर्व प्रक्रियेवर दुर्लक्ष असल्याने या अश्या धोक्यांना सामन्यांना सामोरे जावे लागणार असून,भविष्यात मोठी समस्या उद्भवल्यास त्यास जबाबदार कोण? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.
