वाढदिवसाचा खर्च टाळून “महामानव बाबा आमटे सामाजिक विकास संस्थे” स २१ हजारांची मदत..

दिनांक २० जानेवारी,श्रीगोंदा:

श्रीगोंदा तालुक्यात अनंत झेंडे हे आदिवासी समाजातील मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी बऱ्याच वर्षांपासून “महामानव बाबा आमटे सामाजिक विकास संस्थे”च्या माध्यमांतून कामं करीत आहेत. समाजातील शोषित, वंचित बांधवांच्या लेकरांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून, त्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध व्हावी. यासाठी ते अनेक वर्षांपासून झगडत आहेत. मागासवर्गीय विद्यार्थ्यांची शैक्षणिक पात्रता वाढावी यासाठीही ते प्रयत्नशील आहेत.

https://bit.ly/bspmycityshrigonda

या कार्याला प्रभावित होऊन (बारडगाव सुद्रीक ता.कर्जत) हल्ली नोकरीनिमित्त मुंबई येथे स्थायिक असणारे श्री. संध्या/गणेश मोहन सुद्रीक या दापत्याने आपली मुलगी माही हिच्या वाढदिवसाचा खर्च टाळून, महामानव बाबा आमटे संस्था बनवीत असलेल्या कॉम्पुटर रूमच्या फर्निचरसाठी २१ हजार रुपयांची मदत केली आहे.

मढेवडगाव येथील युवक कार्यकर्ते श्री. संदीप विश्वनाथ मांडे यांची ती भाची असून, त्यांच्या मातोश्रीच्या हस्ते आज संस्थेचे सर्वेसर्वा अनंत झेंडे यांच्याकडे रोख स्वरूपात ही मदत देण्यात आली.

स्रोत:(संदीप मांडे,मढेवडगाव,श्रीगोंदा)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading