भिंगाण गावाच्या वैभवात वृक्षांची भर..संभाजी ब्रिगेडचे कामावर लक्ष..

दिनांक २० जानेवारी(भिंगाण,श्रीगोंदा):

भिंगाण खालसा – दुमाला गावांमध्ये गेली दहा वर्ष सातत्याने रस्ता, पूल व अन्य जनहिताची कामं वेळोवेळी मार्गी लावण्याचे काम संभाजी ब्रिगेडने केले आहे. वेळप्रसंगी रस्त्यासाठी व पुलासाठी पाण्यात बसून आमरण उपोषण केलेले आहे.

https://bit.ly/bspmycityshrigonda

२०१० पासून भिंगाण गाव विकासापासून कोसो दूर” अशा बातम्या यायच्या. आज ही परिस्थिती बदलत चालली आहे. भिंगाण दुमाला – खालसा गावांमध्ये सामाजिक वनीकरण विभागाचे अतिशय चांगले कामं चालू आहे. गावांमध्ये २००० रुक्ष लागवड झालेली असून, स्थानिक गावकऱ्यांना यामधून रोजगारही मिळत आहे. या ठिकाणी वनपाल पुंडे यांच्या समवेत स्थानिकांच्या माध्यमांतून संभाजी ब्रिगेडने याबाबत बैठक केली. झाडांचे संगोपन, झाडांचे संरक्षण, झाडांना पाणी कसे द्यायचे ? यासंदर्भात ही बैठक आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी महिलांनी पोटच्या पोरा प्रमाणे झाडं सांभाळणार ! अशी खूणगाठ मनात बांधून, या बैठकीची सांगता झाली.

याप्रसंगी आप्पासाहेब शेंडगे पाटील, दत्ता खंडागळे, आप्पा मासाळ, धनंजय खंडागळे, सचिन शेंडगे, गुणाजी खंडागळे, पिंटू खंडागळे, बाबुराव देवकाते, (वनपाल) मुंडे साहेब, गणेशजी पांढरकर, (संभाजी ब्रिगेड तालुकाध्यक्ष) नानासाहेब शिंदे तसेच महिला उपस्थित होत्या.

स्रोत:(नानासाहेब शिंदे,संभाजी ब्रिगेड)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading