श्रीगोंदा येथे २३ वर्षीय युवकाची आत्महत्या: परिसरात हळहळ..

दिनांक २४ जुलै २०२४,श्रीगोंदा:

येथील एका दुःखद घटनेत २३ वर्षीय युवकाने आपल्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. स्वप्नील बबन रासकर असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव असून तो आपल्या घराच्या जवळच राहणाऱ्या आपल्या मावस भावाशी काल शेवटच्या वेळेस भेटला होता.

दिनांक २४ जुलै २०२४ रोजी दुपारी ३:०० वाजता, नवनाथ कोथींबीरे आणि त्यांचे जोडीदार रोहन जाधव यांनी स्वप्नील सकाळपासून दिसला नसल्याचे लक्षात आल्यामुळे चिंतित होऊन ते त्याच्या घरी गेले. घराच्या गेटला आतून कुलूप लावलेले असल्याचे दिसल्याने त्यांनी खिडकीतून घरात डोकावले. आत पाहिल्यावर स्वप्नीलने लोखंडी चॅनेलला बेडसीटच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे  दिसले.

स्वप्नीलच्या शरीरात कोणतीही हालचाल नव्हती. नवनाथ यांनी तातडीने स्वप्नीलच्या मोठ्या भावाला, निखील रासकर यास, फोनद्वारे ही माहिती दिली. घटनेचे कळताच शेजारील लोक आणि नातेवाईक जमा झाले. तातडीने पोलीसांना माहिती दिल्यानंतर, पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मावसभाऊचे प्रेत खाली घेतले.

प्रेत ग्रामीण रुग्णालय श्रीगोंदा येथे डेडरुममध्ये शव विच्छेदन करण्यासाठी ठेवण्यात आले. स्वप्नीलने आत्महत्या का केली..? याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या दुःखद घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. स्वप्नीलच्या आत्महत्येचे कारण शोधण्यासाठी पोलीस पुढील तपास करीत आहेत.

स्रोत:(खबर)

जाहिरात..

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading