अनधिकृत उत्खननामुळे श्रीगोंद्यात गुप्तधन आणि अंधश्रद्धेचा प्रकार..? परिसरात भीतीचे वातावरण..

दिनांक २४ जुलै २०२४, श्रीगोंदा:

शहरातील एका जुन्या वाड्याच्या परिसरात गुप्तधन शोधण्यासाठी अंधश्रद्धेच्या आधारे अनधिकृत उत्खनन सुरू असल्याची घटना समोर आली आहे. स्थानिक नागरिकांच्या जागरूकतेमुळे हे प्रकरण उघडकीस आले. वाड्याच्या परिसरात उगवलेली झाडं/झुडपं तोडून साफसफाई करण्याच्या नावाखाली बाहेरच्या अनोळखी इसमांनी टिकाव, पहारीच्या सहाय्याने उत्खनन सुरू केले होते.

दिनांक २१ जुलै २०२४ रोजी पौर्णिमेच्या दिवशी अनधिकृत उत्खननाचे काम सुरू करण्यात आले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. काही नागरिकांनी घटनास्थळी पाहणी केली असता, त्यांना लिंबांना नक्षी करून बाहुल्या तयार केल्याचे आणि त्यांची पूजा झाल्याचे दिसले. उत्खनन सुमारे पंधरा फूट खोल सुरू होते, आणि वीज कनेक्शनचा वापर करून काम चालू होते.

पौर्णिमेच्या दिवशी हे उत्खनन सुरू केल्याने आणि वाड्याच्या आसपास शाळा व विद्यालय असल्याने, लोकांमध्ये अंधश्रद्धेच्या प्रकाराची शंका निर्माण झाली. काहींनी नरबळी, गुप्तधन किंवा इतर अघटित घटनांचा डाव असल्याची शंका व्यक्त केली. नाराज नागरिकांनी संध्याकाळी १०:३० वाजता श्रीगोंदा पोलीस स्टेशनला तक्रारी अर्ज दाखल केला.

या घटनेबाबत श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भोसले यांनी सांगितले की, प्रकरणाचा तपास सुरू आहे आणि चुकीचे आढळल्यास कारवाई करण्यात येईल. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यांतर्गत कारवाईची सूचना केली आहे. तसेच, ऐतिहासिक वास्तूचे उत्खनन करताना पुरातत्त्व विभागाची मान्यता आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

अंधश्रद्धा निर्मूलनच्या पदाधिकाऱ्यांनी नमूद केले की, अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यांतर्गत या प्रकरणात कारवाई होणे आवश्यक आहे. तसेच, कोणत्याही ऐतिहासिक वास्तूचे उत्खनन करताना पुरातत्त्व विभागाची मान्यता आवश्यक आहे. हा प्रकार अंधश्रद्धेच्या आधारे करण्यात आल्याचे प्रथमदर्शी स्पष्ट होत आहे.

स्रोत:(मिळालेल्या माहितीनुसार)

जाहिरात…

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading