कोळगाव येथील बाजार लिलाव १८७०००/- हजार रुपयांना ..

दिनांक २४ जुलै २०२४,कोळगाव, श्रीगोंदा:

कोळगाव येथील आठवडे बाजार लिलाव बुधवार दिनांक २३ जुलै २०२४ रोजी पार पडला. ३६ आठवड्यासाठी झालेल्या या लीलावाची बोली अजय पोपट नलगे यांनी १८७०००/- हजार रुपयांची बोली लावून लिलाव घेतला.

कोळगाव हे आठवडे बाजाराचे मोठे गाव असून परिसरातील कोथुळ, ढोरजा, चिखली, कोरेगाव, सुरेगाव, घुटेवाडी या ठिकाणावरून बाजारासाठी विक्रेते व ग्राहक येतात. कोरोना कालावधीपासून बाजार आवक जावक कमी झाली होती. परंतु सध्या पुन्हा एकदा बाजार सावरताना दिसत आहे. कोळगाव ग्रामपंचायत ने २४ जुलै २०२४ ते ३१ मार्च २०२५ अखेर ३६ आठवड्यांचा लिलाव जाहीर केला होता.

यामध्ये सहा जणांनी सहभाग घेतला. २५ हजार रुपये डिपॉझिट होते. १८६०००/- हजारापर्यंत लिलाव गेला असता कोळगाव मधील प्रतिष्ठित व्यापारी अजय पोपट नलगे यांनी हा लिलाव  १८७०००/- रुपयांना घेतला. ग्रामविकास अधिकारी शरद कवडे यांनी लिलावाची बोली पुकारली व शेवटी तीन वार बोलून अजय नलगे यांना बाजार लिलाव देण्यात आला.

यावेळी कोळगावचे सरपंच पुरुषोत्तम लगड, उपसरपंच मायाताई मेहत्रे, ग्रामपंचायत सदस्य जयराज लगड, विलास शितोळे, महेंद्र रणसिंग, नंदू लगड, शोभा पवार, निखिल लगड, शितल जगताप व इतर ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.

कोळगाव येथील बाजार तळावर पावसामुळे चिखल होत असून, उताराने वाहत येणारे पाणी बाजार ओटे येथेच थांबते. त्यामुळे विक्रेते व ग्राहक यांना बाजार करताना गैरसोय होते. कोळगाव ग्रामपंचायतने वेळीच लक्ष देऊन ज्या ठिकाणी चिखल होतो व पाणी तुंबते त्या ठिकाणी उपाययोजना करावी तसेच निवाऱ्यासाठी शेड उपलब्ध करावे अशी मागणी विक्रेते व ग्राहक यांनी केली आहे.

स्रोत:(पत्रकार महेश शिंदे)

जाहिरात…

Leave a Reply