प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रदीप गोसावी यांच्या हस्ते या शिबिराचे उदघाटन झाले.यावेळी,लोकाधिकार आंदोलनाचे प्रवक्ते तथा ग्रामीण विकास केंद्राचे समन्वयक बापू ओहळ,सुवर्णा पाचपुते,शुभांगी जंगले,डॉ.सचिन सोनवणे,भटके विमुक्त महिला नेतृत्व विकास कार्यक्रमाच्या समन्वयक लता सावंत,काजोरी पवार,रोहिणी राऊत,मनीषा शिंनगाण,संतोष भोसले,छाया भोसले,डॉ.प्रदीप शिंदे, प्रसाद टकले,मंगल जगताप,मनीषा कडूस,शीतल वाघमारे,राहुल खोमणे,राहुल कोरे,साजिद शेख,विलास निंबाळकर,दिगंबर काळे,भामा फुलमाळी,शोभा वामन आदी उपस्थित होते.
यावेळी जोशी वस्तीवरील महिलांच्या रक्तदाब,हिमोग्लोबिन,रक्तातील साखर,पांढरी कावीळ तसेच गरोदर महिलांची संपूर्ण तपासणी, मोतीबिंदू व नेत्र तपासणी करण्यात आली.मोतीबिंदू असलेल्या महिलांची मोफत शस्रक्रिया बुधराणी हॉस्पिटल पुणे येथे करण्यात येणार आहे.या शिबिराचा लाभ जोशी वस्तीवरील शेकडो महिलांनी घेतला. प्रारंभी ग्रामीण विकास केंद्राचे समन्वयक बापु ओहोळ यांनी या उपक्रमाविषयी सविस्तर माहिती दिली. लता सावंत यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले.संतोष भोसले यांनी आभार मानले.