साकळाई प्रश्नी अधिवेशना पूर्वीच बैठक घ्यावी : बबनराव पाचपुते

— मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन केली विनंती —

श्रीगोंदा दिनांक ३० जून – सकळाई चा प्रश्न सोडविण्यासाठी फडणवीस सरकार केवळ प्रयत्नशील च नसून सकारात्मक भूमिकेत आहे. सध्या सुरू असलेले पावसाळी अधिवेश संपण्यापूर्वी च साकळाई संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत प्रशासकीय बैठक घ्यावी, अशी मागणी माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी केली आहे.
आषाढी वारीत असलेल्या पाचपुते यांनी गुरुवारी (दि.२७) मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची धावती भेट घेतली. या संदर्भात माहिती देताना श्री. पाचपुते म्हणाले, “काही महिन्यांपूर्वी च मुख्यमंत्री यांनी नगर येथे येऊन शेतकऱ्यांना याबाबत शब्द दिला होता. साकळाई योजनेची इच्छापूर्ती फडणवीस सरकार च करेल असा शेतकऱ्यांना विश्वास आहे. अधिवेशन संपण्यापूर्वीच या बाबत मुख्यमंत्र्यांनी (जलसंपदा मंत्री)गिरीश महाजन,(विधानसभेचे उपसभापती )विजयराव औटी, नगरचे (पालकमंत्री )राम शिंदे,(गृहनिर्माण मंत्री)राधाकृष्ण विखे पाटील व(खासदार)सुजय विखे पाटील आदींसह संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घ्यावी. त्याला जोडूनच डिंभे च्या बोगद्याचा विषय यामध्ये घेण्यात यावा अशी विनंती केली. त्यावर लवकरच बैठक घेण्याचे आश्वास मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. या प्रकरणी दोन दिवसांत बैठक होईल असे समजते.
त्या प्रमाणेच,बेलवंडी ग्रामीण रुग्णालय नविन इमारत मंजूर करण्यासाठी आरोग्यमंत्री (राज्य)एकनाथ शिंदे यांना निवेदन दिले.लवकर आरोग्य खात्याकडून मंजुरीचा आदेश निघेल.हिरडगाव,चिखली व घरगावच्या ३३/११ केव्ही सबसस्टेशन साठी आपण पत्र दिले होते.(ऊर्जामंत्री )चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंजुरीचे आदेश देऊन वितरण चे उपसचिव यांच्याकडे हे निवेदन दिले आहे.या गावांचा विजेचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघाला असल्याचे पाचपुते यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे सांगितले.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading