महादजी शिंदे विद्यालयाचे उपप्राचार्य भाऊसाहेब दळवी व प्रयोगशाळा परीचर आनंदा गलांडे यांचा सेवापूर्ती व अभिष्टचिंतन सत्कार समारंभ संप्पन्न.
दिनांक ३० जून :
कार्यक्रमाच्या सुरुवातीला दळवी दांपत्य व गलांडे दांपत्य यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.रयत शिक्षण संस्थेचे प्रतीक असलेले चांदीचे नाणे देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.
जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तसेच.रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य.बाबासाहेब भोस हे अध्यक्षस्थानी होते.त्यांनी आपल्या मनोगतामध्ये उपप्राचार्य दळवी सर व आनंदा गलांडे यांनी रयत शिक्षण संस्थेमध्ये केलेल्या सेवेचे कौतुकही केले.पुढील जीवनासाठी शुभेच्छा दिल्या .
याप्रसंगी स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य व माजी प्राचार्य तुकाराम दरेकर सर,सत्कार मूर्ती उपप्राचार्य दळवी सर यांनीही आपल्या भावना यानिमित्ताने व्यक्त केल्या.रवीशेठ दंडनाईक,विद्यालयाचे प्राचार्य टी.पी.कन्हेरकर स्थानिक नगरसेवक सर्व सेवक वृंद तसेच दळवी आणि गलांडे कुटुंबीय व नातेवाईक, आजी,माजी विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने याप्रसंगी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधीर साबळे तर आभार प्रदर्शन नवनाथ बोडखे यांनी केले.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading