पेडगाव येथील रमेश घोडके यांची गळफास लावून आत्महत्या..

पेडगाव,श्रीगोंदा,दिनांक १२ जुलै:(वार्तांकन:शफीक हवलदार)
 श्रीगोदा तालुक्यातील पेडगाव गावातील रमेश बळीबा घोडके वय ५३ यांनी गट क्र.५८४ या शेतामध्ये गुरुवार दि.११ जुलै,रोजी सकाळी ९ वाजनेच्या सुमारास लींबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याचे दुर्दैवी घटना घडली आहे.
त्यांच्यावर स.सोसायटी,बँक व बचत गटाचे कर्ज होते.त्या तणावातून त्यांनी आत्महत्या केली असल्याची सामन्यांच्यात चर्चा आहे.दुष्काळी परिस्थिति आसल्यामळे त्यांना कर्ज भरता आले नाही.शिवाय नविन कर्जही मिळू शकले नाही.काही दिवसांवर येऊन ठेपलेले मुलाचे लग्न आणि उदभवलेली परिस्थितीच्या मानसिक तणावातून,रवीवार दि.११ जुलै रोजी सकाळी लिंबाच्या झाडाला गळफास घेत जीवनयात्रा संपवल्याचे पंचक्रोशीत बोलले गेले.त्यांच्या मागे (पत्नी,दोन मुले व एक मुलगी आसा परिवार आहे.रमेश बळीबा घोडके हे पेडगाव ग्रा.प.चे माजी सरपंचाचे पती होते.बरेच वर्ष कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांनी मासे विकण्याचा व्यवसाय केला,असल्याचे समजते आहे.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading