वृक्षदान कार्यक्रम संपन्न..

मढेवडगाव,श्रीगोंदा दिनांक १५,जुलै:

श्रीगोंदा तालुका माजी(पशु वैद्यकीय अधीकारी) डॉ.अरविंद उंडे आणि उंडे परिवार यांच्या प्रयत्नातून न्यु इंग्लिश स्कुल मढेवडगाव या ठिकाणी विद्यार्थ्यांस ११११वृक्षांचे वाटप करण्यात आले.यामधे बोर,आंबा,सीताफळ,चिंच,मोह, आवळा,अशोका,जांभूळ अशा अनेक फळझाडांचे वाटप विद्यार्थ्यांस करण्यात आले.आणी या झाडाची एक वर्षेभर योग्य निघा राखल्यास त्या विद्यार्थ्यांस योग्य बक्षीस दिले जाईल असे ही डॉ.उंडे यांनी आपल्या मनोगत सांगितले.

या कार्यक्रमासाठी प्रमुख व्याख्याते म्हणून वृक्षमित्र आबासाहेब मोरे उपस्थीत होते.त्यांनी पर्यावरणाचा समतोल कसा राखायचा, झाडांची निघा कशी करायची याचे मार्गदर्शन आपल्या व्याख्यानमालेतून केले.त्याच बरोबर या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थीतांन मध्ये पत्रकार व अग्नीपंख फौंडेशनचे सर्वेसर्वा बाळासाहेब काकडे तसेच पत्रकार संजय काटे उपस्थीत होते.

ग्रामीण पत्रकार श्री.विजय उंडे ही या ठिकाणी उपस्थीत होते. गावातील मान्यवर या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थीत होते.शाळेचे मुख्याध्यापक श्री कोरडे सर ,(ना.का.संचालक)सुभाष शिंदे,(सरपंच)महानंदा मांडे,(उपसरपंच)कल्याणीताई अमोल गाडवे,(तंटामुक्ती अध्यक्ष) सचिन उंडे,साहेबराव उंडे,गेनानाना मांडे,योगेश मांडे,गणेश मांडे,आंबर मांडे,नवनाथ उंडे,तात्या उंडे,स्मितल वाबळे,पीटर रणसिंग,राहुल साळवे आणि विद्यार्थी पालक शिक्षक उपस्थीत होते.कार्यक्रमाचे आभार श्री प्रसादजी उंडे यांनी केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोरखराजे उंडे यांनी केले.


Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading