महादजी शिंदे विद्यालयात गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा..

श्रीगोंदा, दिनांक १६ जुलै:
मानवाच्या जीवनामध्ये आई-वडील आणि गुरुचे स्थान अनन्यसाधारण आहे.ज्या महापुरुषांनी मानवी जीवन सुखकर होण्यासाठी योग्य दिशा दिली.त्यांच्या मार्गदर्शनामुळे मानवाचं जीवन सुसह्य झाले.अशा सर्व महापुरुषांना आपण गुरु मानलं पाहिजे. या गुरुचा वसा आपण आयुष्यभर जपला पाहिजे.कर्मवीर भाऊराव पाटील,महात्मा ज्योतिराव फुले,सावित्रीबाई फुले,छत्रपती शिवाजी महाराज,डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आधुनिक काळातील समाजाचे गुरूच आहेत.या महापुरुषांच्या विचारावर आधारित समाजाची निर्मिती करणे,हे आपले आद्य कर्तव्य ठरते.असे प्रतिपादन महादजी शिंदे विद्यालयाच्या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. अनिल घोडके यांनी व्यक्त केले.
विद्यालयाचे प्राचार्य कन्हेरकर सर यांनी गुरूचे उपदेश मानवतेसाठी असतात,असे प्रतिपादन केले.तर,प्रा.तोंडे सर यांनी मानवाचे कल्याण गुरुने दिलेल्या विचाराची साधना करण्यात घालवले पाहिजे.असे विचार व्यक्त केले.विद्यार्थ्यांमध्ये म्हस्के साईराज व संकेत सुपेकर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने झाली.सर्व शिक्षक व इतर सेवकांना पेन व गुलाबपुष्प देऊन सन्मानित करण्यात आले.कार्यक्रमाचे नियोजन इयत्ता दहावी “ड” विद्यार्थी(वर्गशिक्षक)श्री.व्ही.बी.वाघ सर व(सांस्कृतिक विभागप्रमुख)सचिन झगडे सर,थिटे सर यांनी केले.
याप्रसंगी,(उपप्राचार्य)बी.एस.जाधव,(पर्यवेक्षक) यू.एम.बुधवंत सर,पिटर रणसिंग,स्थानिक स्कूल कमिटीचे तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे विविध मान्यवर सदस्य यावेळी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रणव मोढवे व आभार सिद्धांत बारगुजे याने मानले..
Related