पोलिस कॉन्स्टेबल कोतकर यांना जबर मारहाण.प्रशासनास खबर देत,पत्रकरांनी केली सोडवणूक…पिसोरे खांड येथील घटना..
पिसोरे खांड,श्रीगोंदा,दिनांक १८ जुलै:
येथील आषाढ महिन्यात भरणाऱ्या खाकी बाबांच्या यात्रा उस्तवात पोलिस कॉन्स्टेबल कोतकर यांना जमावाकडून जबर मारहाण झाल्याची घटना आज दिनांक १८ जुलै रोजी ३:४५ वाजनेच्या दरम्यान घडली. यावेळी मोठा जमाव या पोलिसाच्या मागे धावत पळत मारहाण केली आहे.आडदांड प्रवृत्तीच्या १५ ते २० इसमांनी हे गैर कृत्य केले आहे.
श्रीगोंदा मांडवगण नगर रोडवर हे देवस्थान आहे.आषाढ महिन्यात तिसऱ्या गुरुवारी हा यात्रा उत्सव भरतो.येथे आजूबाजूच्या गावांतील लोक आनंद साजरा करण्यासाठी येतात.त्यात काही टवाळखोर प्रवृत्ती लोक ही येतात. त्यातून वाद निर्माण होतात.आज रोजी श्रीगोंदा मांडवगण रोडवर खाकी बाबा देवस्थान शेजारी झालेली वाहनांची गर्दी हटवण्यासाठी श्रीगोंदा रोडवर पोलीस हवालदार अनिल भारती व नगर रोडवर पो.कॉ. कोतकर हजर होते.मात्र गर्दी वाढल्याने ती सुरळीत करण्यासाठी पो.कॉ. कोतकर यांनी देवस्थानच्या शेजारील वाहने व गर्दी हटवताना तेथील काही गावगुंड प्रवृत्तीच्या २५ ते ३५ वयोगटातील तरुण व ५० च्या आसपास असलेल्या एका पांढरा पायजमा, शर्ट घातलेल्या इसमाने पोलीस कॉन्स्टेबल कोतकर यांच्यावर राग अनावर होऊन हल्ला चढवला.अक्षरशः नगर रोड पासून खाकी बाबाच्या देवस्थान समोर भेळीच्या दुकाना समोर पळून पळून त्यांना मारहाण करण्यात आली आहे.या पोलीस कर्मचाऱ्यांला अक्षरशः लाथा बुक्क्यांचा मार दिला आहे .यावेळी घटनास्थळी असलेल्या प्रहारच्या माजी शहराध्यक्ष नितीन रोही यांनी मोठ्याने ओरडून पोलीस असल्याचे त्या जमावाला सांगितले. मात्र जमावाने मारहाण करण्याचे थांबवले नाही.शेवटी नितीन ने त्या पोलीस कर्मचाऱ्याला मिठी मारली आणि त्या जमावातून बाजूला घेऊन गेले.यावेळी नितीन रोही यांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव व उप निरक्षक सोमनाथ कर्णवर यांना संपर्क करीत घटनेची माहिती दिली.यानंतर घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त आला असून,तपास चालू आहे.