मतदार नोंदणी साठी विशेष मोहीम..

श्रीगोंदा, दिनांक १९ जुलै:
भारत निवडणूक आयोगाने आगामी विधानसभा निवडणूक विचारात घेत ,१जानेवारी २०१९ या अहर्ता दिनांकावर आधारित विशेष मतदार नोंदणी मोहीम सुरू केलेली आहे. ज्या मतदारांचे नाव मतदार यादीत नसेल.अशा सर्व मतदारांची नोंदणीसाठी श्रीगोंदा तालुक्यातील सर्व मतदान केंद्रावर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी BLO यांची नेमणूक केली असून,त्यांचेकडे “फॉर्म न 6” भरून देण्यात यावेत.तसेच,नावासह इतर दुरुस्तीसाठी “फॉर्म न 8” BLO कडे देण्यात यावेत.या मोहिमेचा कालावधी 30 जुलै पर्यंत असून, मतदार यादीत ऑनलाईन नाव शोधण्यासाठी http://www.nvsp.in या संकेतस्थळाचा आधार घेण्यात यावा. आपले ऑनलाईन नाव नोंदणी साठीही http://www.nvsp.in याच संकेतस्थळाचा वापर करू शकता.अशी माहीत तहसीलदार महेंद्र माळी(महाजन)यांनी माध्यमांना प्रसिद्धी साठी दिली आहे.
तशेच,विशेष मोहीम दिवस म्हणून २० जुलै,२१ जुलै,२७ जुलै,२८ जुलै रोजी प्रत्येक मतदान केंद्रावर नमूदप्रमाणे मतदार नोंदणी बाबत तहसीलदार श्रीगोंदा तथा सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांनी श्रीगोंदा तालुक्यातील सर्व मतदारांना आवाहन केले आहे.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading