श्रीगोंद्यात एट्रोसिटी नुसार गुन्हा दाखल करतांना,पिडीतास मार्गदर्शन करणाऱ्या अज्ञानी कार्यकर्त्यांचा वाढता हस्तक्षेप रोखण्याची गरज…
श्रीगोंदा दिनांक २४ जुलै:
श्रीगोंदा तालुका दलित आदिवाशी अत्याचार ग्रस्त तालुका म्हणून घोषित करण्यासंदर्भात अनेक वेळी वेगवेगळ्या संघटनांन मार्फत आंदोलने झाल्याचे नवीन नाही.अनेक पुरोगामी संघटना एकत्र येत जनाबाई बोरगे,जवखेडा ते भानगाव येथील आदिवाशी महिलेला विवस्त्र मारहाण प्रकरणापर्यंत,येथील व्यवस्थेचा निषेध केलेला आहे.आत्ताहि,श्रीगोंदा तालुका कार्यक्षेत्रात अश्या अत्याचारच्या घटना घडतच आहेत.वास्तवात काही प्रकरणे पोलिसांपर्यंत येतात.तर,काही बाहेरच मिटवल्याचे या विषयाच्या निमित्ताने बोलणे गैर ठरणार नाही.
तालुक्यातील दलित आदिवाशी अत्याचार प्रकरणात वाढता राजकीय हस्तक्षेप,या कायद्यासाठी गंभीर स्वरुपात पुढे येत आहे.काही घटना घडली कि,या – ना त्या संघटनेचे पदाधिकारी श्रीगोंदा पोलीस स्टेशनला हजर असतात.यातून पिडीताला कायदेशीर मार्गदर्शन होण्याऐवजी,आलेल्या संघटनेचा पदाधिकारी पिडीताच्या विरोधात असलेला आरोपी कोणत्या संघटनेचा किंवा कोणत्या राजकिय भूमिकेतला आहे.यानुसार अत्याचार ग्रस्त इसामचा वापर केला जातो आहे.गुन्हा दाखल करायचा कि नाही? हा निर्णय पिडीतापेक्षा आलेला संघटनेचा पदाधिकारी जास्त ठरवताना येथे निदर्शनास येत आहे.
त्याचबरोबर,अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा वापरा दरम्यान,तक्रार नोंदविताना पिडीतावर दबाव आणला जाऊ शकतो, एफ.आय.आर दाखल करतेवेळी पोलिसांकडून फिर्यादीस दम दिला जाऊ शकतो,आरोपी अटक करतेवेळी आरोपींना पोलिसांकडून सवलत दिली जाऊ शकते, तपसावेळी हलगर्जीपणा केला जाऊ शकतो,आरोपपत्र दाखल करते वेळी त्रुटी ठेवल्या जाऊ शकतात.हे सर्व घडण्यामागे वाढता राजकीय हस्तक्षेप येथील दलित,आदिवाशी अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या सदउपयोगा बरोबरच गैरवारासाठी कारणीभूत ठरत आहे.
यामुळे ऍट्रोसीटी चा गुन्हा दाखल करतांना फिर्यादीस (अनुसुचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक) कायद्याची माहिती नसल्याने,या मोकाट कार्यकर्त्यांकडून पीडितांची होणारी दिशाभूल टाळण्यासाठी,स्थानिक पोलीस प्रशासनाने कायदेशीर पावले उचलेने गरजेचे आहे.अश्या घटनांसह गंभीर स्वरूपाच्या कायद्या विषयी अज्ञान असणाऱ्या कार्यकर्त्यांच्या व संघटनांच्या हस्तक्षेपामुळे,दलित,आदिवाशी अत्याचार प्रतिबंधक कायद्याचा गैरवापर होण्याची शक्यता श्रीगोंदा कार्यक्षेत्रात बळावत चालली आहे.
यासाठी,श्रीगोंदा पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी योग्य ती उपाययोजना हाती घेत.अश्या कार्यकर्त्यांना आवर घालावी,अशी अपेक्षा श्रीगोंद्यात व्यक्त होत आहे.