सरस्वती नदी पात्रात अनधिकृत गौण खनिज उत्खनन,प्रशासनाकडून कारवाईस विलंब…

श्रीगोंदा,दिनांक २४ जुलै:
श्रीगोंदा तालुक्यात अनधिकृतरित्या गौण खनिज उत्खनन चालू असल्याचे नवीन नाही.प्रत्येक नदीच्या पात्रात अनधिकृत पणे वाळू,मुरूम,माती उपसा केला जात आहे.जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक इशू सिंधू यांनी प्रशासनाची सूत्रे हातात घेतल्यानंतर,जिल्ह्यात वाळू तस्करी वर काही अंशी अंकुश ठेवण्यात यश आले.मात्र पूर्ण पणे ते या माफियांवर कारवाई करू शकलेले नाहीत .श्रीगोंदा तालुक्यात महसूल विभाग किंवा तहसीलदारांच्या यंत्रनेने या अवैध्य व्यवसायाकडे काही प्रमाणात दुर्लक्ष जरी केले असले.तरी श्रीगोंदा पोलिसांनी मात्र याप्रकरणी चांगलीच बाजू लाऊन धरली आहे.अनेक नदीपात्रा लगत असलेल्या गावांत पोलिसांनी कारवाई केल्याची माहिती आहे.
श्रीगोंदा पोलीस आणि श्रीगोंदा तहसील या दोघांच्या नजरा तालुक्यातील विविध भागातील नदी पात्रात लागलेल्या असतांना,शहरात मात्र खुलेआम मुरूम व वाळू उत्खनन चालू असल्याचे स्पष्ट झाले आहे. श्रीगोंदा शहरातील होले मळा याठिकाणी काही दिवसांपासून हा अवैध्य उद्योग सुरू झाला आहे. यविषयी श्रीगोंद्याचे तहसीलदार महेंद्र माळी साहेबांना विचारणा केली.तर,ते चौकशी करीत असल्याचे समजते आहे.
शहरातच अश्या पद्धतीने चालू असलेल्या उद्योगांना आवर घालण्याचे सोडून,चौकशी करणे कितपत योग्य आहे ? हे मात्र,समजू शकलेले नाही.यासंदर्भात तहसीलदार साहेबांना सविस्तर माहिती उपलब्ध झाली असतांना,कारवाई का होत नाही ?हा प्रश्न उपस्थित होत आहे.
