महादजी शिंदे विद्यालयात यशस्वीतांचा कौतुक सोहळा संपन्न..
श्रीगोंदा दिनांक २५ जुलै:
येथील रयत शिक्षण संस्थेच्या महादजी शिंदे विद्यालयातील विद्यार्थिनी कुमारी यश सुधाकर जानराव हिची सोलापूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला एम बी बी एस साठी निवड झाल्याबद्दल तिचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले.माझ्या यशामध्ये महादजी शिंदे विद्यालय व रयत शिक्षण संस्थेचे फार मोठे योगदान असल्याचे कुमारी यश जानरावने व्यक्त केले.
याप्रसंगी आंतरराष्ट्रीय स्तरावरील कुस्ती मधील पूजा फंड भाग्यश्री फंड यांना घडवणारे,त्यांचे वडील हनुमंत फंड हे दांपत्य याप्रसंगी उपस्थित होते.यावेळी,हनुमंत फंड यांचाही सपत्निक विद्यालया मध्ये सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी विद्यालयाचे(प्राचार्य)कन्हेरकर सर (उपप्राचार्य) जाधव सर,(पर्यवेक्षक)बुधवंत सर,(जुनिअर विभागाचे प्रमुख)नवगिरे सर,(ज्येष्ठ शिक्षक)दरेकर सर,दरेकर मॅडम,पीटर रणसिंग व चोथे मॅडम उपस्थीत होते.(क्रीडा शिक्षक)नवनाथ बोडके सर यांनी आभार मानले.