जिल्हाधिकारी यांच्या शुभहस्ते वीर माता,वीर पत्नीचां सन्मान सोहळा..
श्रीगोंदा दिनांक २५ जुलै:
कारगिल विजय दिवस व भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम स्मृती दिनानिमित्ताने दिनांक २६ जुलै रोजी सकाळी १०.१५ वाजता अग्नीपंख फौंडेशनने श्रीगोंदा येथे (जिल्हाधिकारी)राहुल द्विवेदी यांच्या शुभहस्ते वीरमाता,वीरपत्नी सन्मान सोहळ्याचे आयोजन केले असल्याची माहिती फौंडेशनचे(कोषाध्यक्ष) दिलीपराव काटे व(उपाध्यक्षा) सुरेखाताई शेंद्रे यांनी माध्यमांना दिली आहे. या सोहळ्यात लोकमतचे नगर(जिल्हा आवृत्ती प्रमुख)सुधीरराव लंके यांना डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम सैनीक मित्र पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.यावेळी १५ हजार वृक्ष भेट देत एम.सी.एस.सी.परिक्षा पास विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
सोहळ्याचे अध्यक्षस्थान(नगराध्यक्षा)शुभांगीताई पोटे भुषविणार आहेत.या प्रसंगी (जिल्हा परिषद महिला व बालकल्याण समितीच्या सभापती) अनुराधाताई नागवडे,(माजी जि.प.सदस्या)डॉ प्रतिभाताई पाचपुते, (ओम गुरुदेव महिला पतसंस्थेच्या अध्यक्षा)डॉ. प्रणीती जगताप,मनिषा शेलार,वैजयंता भोस,छायाताई गोरे,सुवर्णाताई पाचपुते सह अन्य विविध संस्थावर काम करणाऱ्या महिला प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
बहादुर जवानांची भुमी
सन १९७१ च्या भारत पाक युद्धापासून,श्रीगोंदा तालुक्यातील १४ जवानांना वीर मरण आले आहे.त्यामुळे,श्रीगोंदा ही बहादुर जवानांची भुमी मानली जाते.शहीद जवानांच्या १८ वीर माता व वीर पत्नींचा श्रीगोंद्यात प्रथमच सन्मान होत आहे.त्यामुळे हा सोहळ्याला विशेष महत्त्व असल्याचे बोलले जात आहे.